Amazon सेलच्या शेवटच्या दिवशी बंपर offer, स्मार्टफोन्सवर मिळत आहे 40% पर्यंत सूट

अ‍ॅमेझॉनवर (Amazon) नुकताच एक नवीन सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहक स्मार्टफोनवर डिस्काउंटचा (Discount) लाभ घेऊन हजारोंची बचत करु शकणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर अ‍ॅमेझॉनच्या या सेलचा तुम्ही नक्कीच चांगला लाभ घेउ शकणार आहात. सेलमध्ये विविध स्मार्टफोन्सवर तब्बल 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.  

Updated: Sep 5, 2022, 03:13 PM IST
Amazon सेलच्या शेवटच्या दिवशी बंपर offer, स्मार्टफोन्सवर मिळत आहे 40% पर्यंत सूट  title=

Amazon Smartphone Upgrade Days Sale चा आज शेवटचा दिवस आहे.  Amazon स्मार्टफोन अपग्रेड डे सेलचा आज शेवटचा दिवस आहे. जर तुम्हाला स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्ही या सेलचा फायदा घेऊ शकता. येथे आम्ही तुम्हाला Amazon Smartphone Upgrade Days Sale मध्ये उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम डील्सबद्दल सांगत आहोत. यामध्ये तुम्ही बँकेच्या ऑफर्सचाही लाभ घेऊ शकता.

Amazon स्मार्टफोन अपग्रेड डे सेलचा आज शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. OnePlus, Xiaomi, Samsung, iQOO, Realme, Tecno आणि Oppo यांच्या स्मार्टफोन्सवर ग्राहकांना 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.

Amazon Smartphone Upgrade Days सेल 5 सप्टेंबर रोजी म्हणजेच आजच चालेल. यामुळे या सेलमध्ये मोबाईल अपग्रेड करण्याची आज शेवटची संधी आहे. याशिवाय bank discount आणि एक्सचेंज ऑफरही दिल्या जात आहेत. यामध्ये 9 महिन्यांपर्यंत No Cost EMI देखील देऊ शकतो.

वाचा : facebook यूजर्संना धक्का! आता यूजर्स हे काम करू शकणार नाहीत

 

या स्मार्टफोन्सवर प्रचंड डिस्काउंट

iQoo Smartphones : सेल दरम्यान iQoo स्मार्टफोन्सवर बंपर सूट दिली जात आहे. या फोन वर बंपर डिस्काउंट आणि बँक ऑफरसह खरेदी केले जाऊ शकतात. या सेलमध्ये iQoo Z6 44W फोन 14,499 रुपयांना विकला जात आहे. याशिवाय सिलेक्ट बँक कार्डवर 1250 रुपयांची ऑफ देखील दिली जात आहे. याशिवाय iQOO Neo 6 5G ला 29,990 रुपयांना खरेदी करता येईल.

OnePlus Smartphones : या अपग्रेड डे सेलमध्ये OnePlus स्मार्टफोन्स बंपर डिस्काउंट आणि EMI पर्यायांसह खरेदी केले जाऊ शकतात. OnePlus Nord CE 2 Lite ला 18,999 रूपयांमध्ये खरेदी करता येईल तर OnePlus 9 Pro ला 49,999 मध्ये खरेदी करता येईल.

 Realme Smartphones: Realme Narzo 50A Rs 5000 च्या कॅशबॅकसह Rs 10,999 मध्ये खरेदी केले जाऊ शकतात. या स्मार्टफोनमध्ये Helio G85 गेमिंग प्रोसेसर, मोठी 6000mAh बॅटरी आणि इतर फीचर्स देण्यात आले आहेत.

Samsung Smartphone : या सेलमध्ये ग्राहक मोठ्या सवलतीसह सॅमसंग स्मार्टफोन देखील खरेदी करू शकतात. सॅमसंग एम सीरीजवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. याच्या मदतीने तुम्ही Samsung Galaxy M32 ला 12,499 रुपयांमध्ये आणि Samsung Galaxy M13 ला 11,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यावर बँक ऑफर्ससह 1500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही दिला जात आहे.