Facebook Jail: 'ही' एक चूक तुम्हाला थेट कोठडीत टाकेल; फेसबुक युजर्सना सतर्क करणारी बातमी

Facebook Use: फेसबुक या सोशल नेव्हर्किंग साईटवर कित्येक तास सक्रिय असणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? पाहा अनावधानानं तुम्हीही चुका तर करत नाही आहात... कारण शिक्षा झाली तर पश्चातापाचीही वेळ मिळणार नाही... 

Updated: Oct 14, 2022, 07:47 AM IST
Facebook Jail: 'ही' एक चूक तुम्हाला थेट कोठडीत टाकेल; फेसबुक युजर्सना सतर्क करणारी बातमी  title=
Alert wrong usage and some mistakes on Facebook might cause Jail read details

Facebook Mistakes: झोपेतून उठल्यापासून ते अगदी दिवस संपताना पुन्हा झोपेपर्यंत सातत्यानं सध्याची पिढी मोबाईलसमोर असते. सध्याच्या काळात सर्वच वयोगटांमध्ये स्क्रीन टायमिंग (Screen Timing) अर्थात मोबाईल, संगणक किंवा तत्सम उपकरणांवर वेळ घालवण्याला पसंती दिली जाते. असंख्य अॅप्स, सोशल मीडिया आणि इंटरनेटची (Internate) उपलब्धता या साऱ्यामुळं टेकसॅव्ही होण्याकडेच अनेकांचा कल दिसतो. पण, प्रत्येकवेळी इतकं अपडेट असणंही धोक्याचं ठरतं. याची कारणं अनेक आहेत. पण, आज आपण फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला केंद्रस्थानी ठेवत आहोत. Facebook वर अनावधानानं काही अशा चुका होत असलीत ज्यामुळं तुमची रवानगी थेट कारागृहात होऊ शकते. 

फेसबुकवर तुम्ही तुमची मतं व्यक्त करत असाल, त्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्यही असेल पण, यावर काही मर्यादाही आखण्यात आल्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या हे जाणून घेणं कधीही फायद्याचं. कारण, पश्चाताप करण्यापेक्षा सतर्क राहिलेलं कधीही उत्तम. 

अभद्र भाषेत केलेल्या पोस्ट 
तुम्ही अशी एखादी पोस्ट (Facebook Post) लिहिता ज्यामध्ये कोणा एका व्यक्तिविरोधात अभद्र भाषेचा वापर करता किंवा त्या पोस्टमधून काही नियमांचं उल्लंघन होत आहे तर तुमच्यावर अर्थात ती पोस्ट करणाऱ्यावर अटकेची कारवाई होऊ शकते. 

अधिक वाचा  : Truecaller वापरण्यापूर्वी ही बातमी वाचाच!

 

आक्षेपार्ह फोटो 
तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून एखादी व्यक्ती, संस्था, समुदायाविषयी आक्षेुपार्ह फोटो शेअर करता तरी तुम्हाला जेल होऊ शकते. फेसबुक बहुतांश प्रकरणी अशा पोस्ट किंवा असे अकाऊंट ब्लॉक करतं (Photo). 

जातीवरून Comments 
ठराविक जात (cast), पंथ यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत प्रतिक्रिया देत व्यक्त होणं तुम्हाला गोत्यात आणू शकतं. इतकं, की थेट कारावासाचीच शिक्षा होऊ शकते. 

अधिक वाचा  : Facebook कर्ताधर्त्या Mark Zuckerberg लाच दणका; जे घडलंय ते पाहून म्हणाल, 'कोण नाय कोणचं....'

 

थोडक्यात एका मर्यादेपलीकडे फेसबुकही कोणत्याही वादाला वाचा फोडणाऱ्या किंवा चालना देणाऱ्या विषयांना दुजोरा देणार नाही. उलटपक्षी तुम्ही असं काही करत असाल, तर यापुढे Facebook हयगय करणार नाही हेच स्पष्ट होत आहे.