एअरटेल ब्रॉडबॅन्डच्या युजर्सनादेखील डाटा रोलओवरची सुविधा

  एअरटेल पोस्टपेडपाठोपाठ आता ब्रॉडबॅन्डच्या युजर्सनादेखील त्यांनी खुषखबर दिली आहे.

Updated: Nov 8, 2017, 01:32 PM IST
एअरटेल ब्रॉडबॅन्डच्या युजर्सनादेखील डाटा रोलओवरची सुविधा  title=

मुंबई :  एअरटेल पोस्टपेडपाठोपाठ आता ब्रॉडबॅन्डच्या युजर्सनादेखील त्यांनी खुषखबर दिली आहे.

आता एअरटेलच्या ब्रॉडबॅन्ड ग्राहकांना त्यांचा उरलेला डाटा पॅक पुढील महिन्यात मिळणार आहे. 

काय आहे ऑफर ? 
एअरटेल डाटा रोलओव्हरच्या सुविधेमध्ये एका सायकलदरम्यान तुमचा काही डाटा राहिल्यास तो पुढील महिन्याच्या बिलिंगमध्ये कॅरी फॉरवर्ड होणार आहे. देशभरात एअरटेल  ब्रॉडबॅन्डचे सुमारे 
 २१ लाख युजर्स आहेत. एअरटेलने प्रोजेक्ट नेक्स्टच्या अंतर्गत ही सुविधा लॉन्च करण्यात आली आहे. अशी माहिती एअरटेलच्या सी ईओनी दिली आहे. 
 
 एअरटेलचया ब्रॉडबॅन्डच्या या सुविधेमुळे तुम्ही १००० जी बी पर्यंत डाटा साठवू शकता. तर पोस्टपेड युजर्स २०० जीबी पर्यंत डाटा साठवणार आहेत.  माय एअरटेल अ‍ॅपवर याबाबतची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.