नवी दिल्ली : जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल सातत्याने नवनवे प्लॅन्स सादर करत आहे. आता एअरटेलने सादर केलेला प्लॅन पाहून जिओ युजर्स थक्क होतील. या प्लॅनमध्ये कंपनी वर्षभरात ३०० GB डेटा युजर्सना देईल. त्याचबरोबर वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधाही देण्यात येईल. तर जिओ ४९९९ रुपयात वर्षभरात 4G साठी ३५० GB डेटा देत आहे. यात देखील अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा आहे. मात्र तुलनेत एअरटेलचा प्लॅन अधिक स्वस्त आहे.
काय आहे प्लॅन ?
एअरटेलने ३९९९ रुपयांचा नवा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगसोबतच ३०० GB देता मिळेल. याचा अर्थ जिओच्या या प्लॅनमध्ये युजर्संना 50GB डेटा अधिक मिळेल. मात्र यासाठी त्यांना १ हजार रुपये अधिक भरावे लागतील. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये युजर्संना तेज १०० एसएमएस देखील फ्री मिळतील.
अनलिमिटेड कॉलिंगचे एअरटेल प्लॅन :
एयरटेलचे ९९९. १९९९ आणि ३९९९ किंमतीचे रिचार्ज प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग सोबत येत आहेत. ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग देत आहे. यात ९० दिवसांसाठी ६० GB डेटा युजर्सना देण्यात येईल. १९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत १२५ GB डेटा मिळत आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी १८० दिवसांची आहे.
एअरटेलचे हे सगळे प्लॅन्समध्ये युजर्सना 4G डेटा दिला जाणार आहे. एखाद्या युजरकडे 4G ला सपोर्ट करणारा फोन नसल्यास तर त्याला अॅक्टोमेटिक 3G डेटा लागू होईल. त्याचबरोबर कंपनीने रिचार्ज प्लॅन्स अशा पद्धतीने लॉन्च केले आहेत ज्यामुळे सर्व नेटवर्क युजर्सना डेटा मिळेल.