फोटोशूट करून Xiaomi ला पाठवा आणि जिंका १९ लाखाचे बक्षिस

जर तुम्हाला फोटोशूट करण्यात आनंद मिळतो. आणि याच फोटोशूटमधून तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल तर ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही फोटोशूट करून Xiaomi ला पाठवून या स्पर्धेत सहभागी व्हा. 

Updated: Nov 14, 2017, 02:05 PM IST
फोटोशूट करून Xiaomi ला पाठवा आणि जिंका १९ लाखाचे बक्षिस  title=

नवी दिल्ली : जर तुम्हाला फोटोशूट करण्यात आनंद मिळतो. आणि याच फोटोशूटमधून तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल तर ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही फोटोशूट करून Xiaomi ला पाठवून या स्पर्धेत सहभागी व्हा. 

चीनी मोबाईल कंपनी शाओमी फोटोग्राफीचे एक चॅलेंज घेऊन आली आहे. यासाठी तुम्हाला फोटोशूट करून शाओमीकडे पाठवावी लागेल. जर तुम्ही ही स्पर्धा जिंकलात तर तुम्हाला तब्बल १९ लाख ६४ हजाराचे पारितोषिक मिळणार आहे. चीनी कंपनीमार्फत ही स्पर्धा इंडिया, रसिया, विएतनाम आणि इंडोनेशियामध्ये भरवली जाणार आहे. ही स्पर्धा २० ऑक्टोबरपासून शुरू झाली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी ११ डिसेंबरपर्यंत फोटो पाठवू शकता. आणि विजेत्यांची घोषणा २० डिसेंबर रोजी पाठवा. 

कसे व्हाल सहभागी 

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कंपनीने काही नियम ठेवले आहेत. यामध्ये फक्त शाओमी Mi A1 वापरणारे युझर्सच सहभागी होऊ शकतात. जर तुमच्याकडे शाओमी Mi A1 नसेल तर तुम्ही बाजारातून हे खरेदी करून या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. हा स्मार्टफोन कंपनीकडून सप्टेंबरमध्ये लाँच केला आहे. ही स्पर्धा प्रमोशनचा एक फंडा असल्याचं सांगण्यात आलं आहे. अट ऐवढीच आहे की, तुम्हाला Mi A1 मधूनच फक्त खोटो खरेदी करून कॅप्शन पाठवायचे आहे. 

अशा पद्धतीने व्हा सहभागी 

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एमआयच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला रजिस्टर करावे लागेल. सर्व माहिती भरून फोटोसाठी तेथे एक वेगळी कॅटेगिरी बनवली आहे. ज्यामध्ये लाईफस्टाईल, नेचर, एनिमल्स, लँडस्केप आणि पिपल सारखे विभाग आहेत. स्पर्धकांनी पाठवलेल्या फोटोंमधून एका बेस्ट फोटोची निवड केली जाईस. 

पहिले बक्षिस १९,६४,००० रुपयांचे 

पहिल्या विजेत्याला १९ लाख ६४ हजाराचे बक्षिस देण्यात येण्यात आहे. दुसऱ्या नंबरच्या विजेत्याला ६ लाख ५४ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहे. तिसऱ्या विजेत्यासाठी ३ लाख २७ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच कंपनी प्रत्येक रिजनमधून टॉप ५ युझर्स देखील निवडण्यात येणार आहे. त्यांना Mi A1 देण्यात येणार आहे. 

एडिटिंग करण्यास मनाई 
या स्पर्धेत स्पर्धकांना फोटोवर कोणतेही एडिटिंग करण्यास मनाई आहे. फोटोशूट आणि एडिटिंगसाठी फक्त Mi A1 चा वापर करण गरजेचे आहे. एक स्पर्धक ११ डिसेंबरपर्यंत रोज १० फोटो अपलोड करू शकतो.