२००० रुपयांहून कमी किंमतीत एअरटेलचे दोन नवे स्मार्टफोन्स

रिलायन्स जिओचा ४जी फोन बाजारात लॉन्च झाल्यानंतर आता एअरटेलनेही आपले २ नवे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 17, 2017, 09:27 AM IST
२००० रुपयांहून कमी किंमतीत एअरटेलचे दोन नवे स्मार्टफोन्स title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओचा ४जी फोन बाजारात लॉन्च झाल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांनीही स्वस्तात स्मार्टफोन उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. आता एअरटेलनेही आपले २ नवे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

एअरटेलने गुरुवारी आपल्या ग्राहकांसाठी २००० हून कमी किंमतीत २ नवे स्मार्टफोन्स लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

एअरटेलने 'मेरा पहला स्मार्टफोन' नावाची स्किम लॉन्च करत म्हटलं की, "सर्व भारतीयांच्या हातात ४जी फोन असावं असं आमचं स्वप्न आहे". या स्मार्टफोनसाठी एअरटेलने मोबाईल निर्माता कंपनी कार्बनसोबत हातमिळवणी केली आहे.

दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत...

एअरटेलने जे दोन स्मार्टफोन्स लॉन्च करण्याची घोषणा केली आहे त्यामध्ये A1 Indian आणि A41 Power यांचा समावेश आहे. एअरटेलने A1 Indian या स्मार्टफोनची किंमत १७९९ रुपये ठेवली आहे. तर, A41 Power या फोनची किंमत १८४९ रुपये आहे.

फोन्सची खास बाब...

दोन्ही स्मार्टफोन्सची स्क्रिन ४ इंचाची आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये ड्युअल सिम, ड्युअल कॅमेऱ्याची सुविधा देण्यात आली आहे. फोनमध्ये १ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. खास बाब म्हणजे दोन्ही फोन्स हे गुगल सर्टिफाईड फोन आहेत. फोनमध्ये अँड्रॉईडचं लेटेस्ट ७.० नॉट ऑपरेटींग सिस्टम असणार आहे. तसेच हे दोन्ही फोन्स एअरटेलच्या १६९ रुपयांच्या मासिक प्लानसोबत ग्राहकांना मिळणार आहेत.

असा खरेदी करता येणार फोन

A1 Indian फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ३२९९ रुपयांचं डाऊनपेमेंट करावं लागणार आहे. तर, A41 Power फोन खरेदी करण्यासाठी ३३४९ रुपयांचं डाऊनपेमेंट करावं लागणार आहे. हे दोन्ही फोन्स एअरटेलच्या सिमकार्डसोबत मिळतील.

ग्राहकांना पूढील महिन्यात ३६ महिन्यांपर्यंत १६९ किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांचं रिचार्ज महिन्याला करावं लागणार. असं केल्यास एअरटेल ग्राहकांना १८ महिन्यांनंतर ५०० रुपये आणि ३६ महिन्यांनंतर १००० रुपयांचं कॅशबॅक मिळेल. अशा प्रकारे ग्राहकांना १५०० रुपयांचं कॅशबॅक मिळेल आणि त्यामुळे दोन हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत हे स्मार्टफोन्स ग्राहकांना मिळतील.