जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि एअरटेलने लॉन्च केला जबरदस्त प्लान

रिलायन्स जिओच्या धमाकेदार प्लान्सनंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये ऑफर्स देण्याच्या स्पर्धाच सुरु झाल्या आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 28, 2017, 10:13 PM IST
जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि एअरटेलने लॉन्च केला जबरदस्त प्लान title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या धमाकेदार प्लान्सनंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये ऑफर्स देण्याच्या स्पर्धाच सुरु झाल्या आहेत.

एकीकडे एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्रीपेड प्लान सादर केला आहे तर, दुसरीकडे आयडिया कंपनीनेही आपला जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे. पाहूयात कुठल्या कंपनीचा आणि कसा आहे प्लान...

असा आहे एअरटेलचा प्लान 

एअरटेल कंपनीने नुकतचं प्रीपेड प्रॉमिस स्किमनुसार नवा प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये कंपनीने ग्राहकांना ४४८ रुपयांत ७० दिवसांसाठी एक जीबी इंटरनेट डेटा देत आहे. 

रिलायन्स जिओच्या ९८ रुपयांच्या प्लानला टक्कर देण्यासाठी एअरटेलने ९३ रुपयांचा रिचार्ज प्लान सादर केला आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स ज्यामध्ये रोमिंग, १० दिवसांसाठी एक जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत. हा रिचार्ज प्लान २जी, ३जी आणि ४जी स्मार्टफोन्सवरही करता येणार आहे.

काय आहे आयडिया कंपनीचा प्लान?

आयडिया कंपनीने आपल्या सध्याच्या ३०९ रुपयांच्या प्लानला अपग्रेड केलं आहे. यानुसार, आता ग्राहकांना २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्सची सुविधा मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल्ससाठी नियम लागू आहेत. 

युजर एका दिवसासाठी जास्तीत जास्त २५० मिनिट फ्री बोलू शकतो. आठवड्याला ही सिमा एक हजार मिनिटांची आहे. जर युजर्स दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक बोलल्यास त्याला प्रत्येक कॉलसाठी एक पैसा प्रति सेकंद या दराने पैसे द्यावे लागणार आहेत. 

काय आहे जिओचा प्लान?

रिलायन्स जिओ आपल्या ९८ रुपयांच्या टेरिफ प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स मिळणार आहे. यामध्ये रोमिंगचाही समावेश आहे. तसेच १४० फ्री एसएमएस आणि २.१ जीबी फेयर युसेज पॉलिसी अंतर्गत अनलिमिटेड हाय स्पीड डेटा देण्यात येणार आहे. जिओचा हा प्लान १४ दिवसांसाठी वैध राहणार आहे.