मारूती सुझुकीची नवी गाडी लॉन्चआधीच रिव्हील, जाणून घ्या किंमत

मारूती सुझुकी आपल्या बहुप्रतिक्षीत नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट कारला ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये लॉन्च करण्यास तयार आहे. नुकतीच ही कार एका टीव्ही कमर्शिअल शूट दरम्यान स्पॉट केलं गेलं.

Updated: Dec 28, 2017, 08:52 PM IST
मारूती सुझुकीची नवी गाडी लॉन्चआधीच रिव्हील, जाणून घ्या किंमत title=

नवी दिल्ली : मारूती सुझुकी आपल्या बहुप्रतिक्षीत नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट कारला ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये लॉन्च करण्यास तयार आहे. नुकतीच ही कार एका टीव्ही कमर्शिअल शूट दरम्यान स्पॉट केलं गेलं.

२०१७ जिनिव्हा इंटरनॅशनल मोटार शोमध्ये ही कार सादर करण्यात आली होती. ही गाडी स्विफ्ट प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे. मारूतीने दावा केलाय की, या हॅचबॅकची चेसिस रेग्युलर मॉडलच्या तुलनेत अधिक हलकी आणि हार्ड असणार. या कारची किंमत ५ लाख रूपयांपासून सुरु होऊ शकते. 

कसा आहे लूक?

लूक्सबाबत सांगायचं तर मारूती सुझुकी स्विफ्टच्या या नव्या मॉडलमध्ये डिझाईन्ड स्वेप्टबॅक हेडलॅम्प्स असतील जे एलईडी डेटाइम रनिंग लाईट्ससोबत असतील. यासोबतच याला नवीन बंपर आणि ग्रील डिझाईन सुद्धा दिलं जाणार आहे. कारचं साइड प्रोफाईल सध्याच्या स्विफ्टसारखं असेल. या गाडीला नवीन डायमंड कट अलॉय व्हिल दिले जाणार आहेत. तसेच यात फ्लोटींग रूफ टच असेल जे दिसायला मारूती सुझुकी विटारा ब्रेझा सारखं असेल. कारच्या मागच्या बाजूला नवीन बंपर आणि टेल लॅम्प्स असतील. 

कसं असेल इंजिन?

इंटरनॅशनल मार्केटमध्ये या गाडीचे दोन इंजिन ऑप्शन असतील. १.० लिटर बूस्टरजेट इंजिन आणि १.२ लिटर ड्यूलजेट इंजिनसोबत दिले जातील. मारूतीच्या नव्या स्विफ्टमध्ये १.२ लिटर व्हिव्हिटी पेट्रोल आणि १.३ लिटर डीडीआयएस इंजिन दिलं जाऊ शकतं. या इंजिनांना ५ स्पीड मॅन्यूअल आणि ऑटोमॅटीक ट्रान्समिशन देण्यात आलंय. स्विफ्टच्या नव्या मॉडलचं प्रॉडक्शन आधीच सुरू करण्यात आलं आहे.