नवी दिल्ली : देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी भारती एअरटेलने बाजारात नव्याने आलेल्या जिओवर गंभीर आरोप केले आहे. जिओने आपल्या धोरणांमुळे बाजाार खराब केला आहे. आता इंटरकनेक्शन शुल्क वाढविला पाहिजे, तसेच ग्राहकांना आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रोत्साहन योजनेची सूट दिली पाहिजे.
इंटरकनेक्शन उपयोग शुल्क (आययूसी) अशा मोबाईल कंपन्यांना मिळतो, जिओ विरोधात प्रतिस्पर्धी तीन दूरसंचार कंपन्या एकत्र आल्या आहेत. यात एअरटेल, व्होडाफोन आणि आयडीया सेल्युलर यांचा समावेश आहे. सध्या आययूसी दर १४ पैसे प्रति मिनिट आहे. हा दर गुंतवणूकीपेक्षा खूप कमी आहे. याला सुधारण्याची गरज आहे. तीन कंपन्यांनी अंतर मंत्रालय समूह (आयएमजी) सोबत वेगवेगळ्या बैठका केल्या आहेत.
आयडीयाच्या म्हणण्यानुसार आययूसीचे दर निर्धारित करण्याची गरज आहे. त्यामुळे बाजार खराब करणारी व्हाइस कॉलच्या किंमती योग्य केल्या तर हे वातावरण बदलू शकतो.
मोफतची खैरात दिल्याने उद्योगावर परिणाम झाला. व्हाईस किंवा डेटा देण्यासाठी न्यूनतम दर निर्धारीत केला पाहिजे. बाजारातील किंमती करणाऱ्या व्यवस्थांना लगाम लावले पाहिजे.