Airplane Mode : प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आज काल लोक विमानप्रवासाला (air travel) प्राधान्य देतात. विमानातून प्रवास करण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतं आहे. अशातच विमान (plane) प्रवास करण्यासाठी आनंदाची बातमी आहे. ज्या लोकांनी विमान प्रवास (air plane) केला आहे त्यांना माहिती आहे की, विमान प्रवासादरम्यान आपल्याला फोन हा Airplane Mode वर टाका लागतो. याचा अर्थ जर एक तासाचा विमान प्रवास असल्यास तर तुमच्या फोन (Phone) तेवढ्या वेळ बंद असतो. त्यामुळे यावेळी जर कोणी तुमच्याशी संपर्क करत असेल तर तो होतं नाही. पण आता चिंता मिटली, कारण तुमच्या फोनमधील Airplane Mode भूतकाळात जाणार आहे.
प्रवासी (passengers) आणि क्रू मेंबर्सना (Crew members) त्यांचे मोबाईल (Mobile) विमान मोडमध्ये ठेवावे लागतात किंवा फोन बंद करावा लागतो. त्यामुळे लांबचा प्रवास करणारे प्रवासी नाराज होतात. नाही तर काही जण जास्तीचे पैसे देऊन वाय-फाय (Wi-Fi) वापरतात. मात्र आता हा नियम बदलणार आहे. युरोपियन युनियन (EU) मधील विमान प्रवासी लवकरच आकाशातही आपल्या फोनचा वापर करु शकणार आहेत.
युरोपियन युनियन कमिशनने 2008 मध्ये विमानासाठी काही फ्रिक्वेन्सी बँड दिले आणि आकाशातही इंटरनेट वापरण्यास परवानगी दिली. पण या बँड्सवरून फारच कमी सिग्नल मिळत होते आणि इंटरनेटचा वेगही खूप कमी होता. अशा परिस्थितीत प्रवाशांना (Airline Passengers) फोन फक्त एअरप्लेन मोडमध्ये ठेवावा लागला. पण आता नियम बदलले आहेत. युरोपीय देशांतील विमान प्रवाशांना त्यांचा फोन एअरप्लेन मोडमध्ये ठेवण्याची गरज भासणार नाही. (Airplane Mode in your smartphone is no longer needed, now make calls from the sky without any hassle)
आता युरोपियन युनियन (European Union) (EU) ने घोषणा केली आहे की ते विमान मोड नियम काढून टाकत आहेत. सदस्य देशांना विमानांसाठी 5G फ्रिक्वेन्सी बँड उपलब्ध करून देण्याची अंतिम मुदत 30 जून 2023 देण्यात आली आहे. म्हणजे लोकांना आकाशातही त्यांचा फोन वापरता येणार आहे. कॉल, इंटरनेट, संगीत, चित्रपट... युरोपियन कमिशनच्या मते, नवीन प्रणाली 5G द्वारे ऑफर केलेल्या जलद डाउनलोड गतीचा लाभ घेण्यास सक्षम असेल आणि गती 100Mbps पेक्षा जास्त असू शकते.