बाईक चालकालाही मिळणार सुरक्षाकवच? कसं असणार पाहा व्हिडीओ

कारप्रमाणे लवकरच बाईकलाही मिळणार सुरक्षाकवच! नेमकं कसं असेल हे सुरक्षाकवच पाहा व्हिडीओ

Updated: Nov 13, 2021, 06:39 PM IST
बाईक चालकालाही मिळणार सुरक्षाकवच? कसं असणार पाहा व्हिडीओ title=

सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे : दरवर्षी भारतात रस्ते अपघातात हजारो लोकांचा मृत्यू होतो. यातील सर्वाधिक प्रमाण हे बाईकस्वाराचं असतं. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. कारप्रमाणे लवकरच बाईकलाही सुरक्षाकवच मिळणार आहे. 

बाईक अपघातामुळे दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो. मात्र येत्या काळात हे प्रमाण खूपच कमी होऊ शकतं. कारण कारप्रमाणेच बाईकलाही एअरबॅगचं सुरक्षाकवच मिळणार आहे. Piaggio आणि Autoliv (ऑटोलिव) या दोन कंपन्या बाईकमध्ये एअरबॅग फिचर देण्यासाठी काम करता येत आहेत. 

अलिकडेच बाईक एअरबॅगची यशस्वी चाचणीही घेण्यात आली. त्यामुळे लवकरच नव्या बाईक्समध्ये आता एअरबॅग फिचरही मिळू शकेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एअरबॅगमध्ये नायलॉनच्या फ्रॅब्रिकपासून बनवलेली एक पातळ उशी असते. ज्याला बलून असंही म्हंटलं जातं. स्टिअरिंग, डॅशबोर्ड, सीट तसच कारच्या दरवाजांमध्ये हे फिचर दिलं जातं.

कशी काम करते एअरबॅग ?

15 ते 20 कि.मी.जास्त वेगानं गाडी आदळल्यास किंवा धडक बसल्यास सेन्सरद्वारे एअरबॅग अॅक्टीव्ह होतात. सोडियम अॅझाईड आणि पोटॅशिअम नायट्रेट यांच्यात प्रतिक्रिया होऊन नायट्रोन वायू बाहेर पडतो आणि अवघ्या काही सेकंदात एअरबॅग फुलते. ज्यामुळे ड्रायव्हर तसेच प्रवाशांना मोठी इजा होण्यापासून बचाव होतो. 

बाईकवरून फिरायला कुणाला आवडत नाही. पण सुरक्षेचा मुद्दा जेव्हा पुढे येतो तेव्हा मात्र कारपुढे बाईकचं काहीच चालत नाही. पण आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण लवकरच बाईकलाही एअरबॅगचं फिचर मिळणारंय. त्यामुळे अपघातात अनेक बाईकस्वारांना सुरक्षा मिळेल एव्हढं मात्र नक्की.