मुंबई : रिलायंस जियोचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी कंपनींच्या वार्षिक बैठकीत फ्री फोन देण्याची घोषणा केली. सोबतच आता ही बातमी देखील मिळते आहे की जिओ आता फिक्स्ड लाईन सेवा देखील सुरु करण्याची तयारी करते आहे.
मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या ४० व्या वार्षिक बैठकीत शेअरहोल्डरच्या प्रश्नांवर बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. मुकेश अंबानी यांनी म्हटलं की, पुढच्या टप्प्याच आपण घरे आणि उपक्रम या दोघांसाठी फिक्स्ड लाईन कनेक्टिविटी उपलब्ध करण्यासाठी ध्यान केंद्रीत करु. याआधी त्यांनी म्हटलं होतं की, जिओ पुढच्या १२ महिन्यात आपल्या वायरलेस नेटवर्कला ९९ टक्के लोकांपर्यंत हे पोहोचवण्यासाठी लक्ष्य केंद्रीत करेल. यामुळे ४जी वापरणाऱ्यांच्या लोकांमध्ये वाढ होणार आहे.
जिओने याआधी शुक्रवारी आपला 4जी रेडी हँडसेट लॉन्च केला. हा फोन फ्रीमध्ये देण्यात येणार आहे. हा हँडसेट ५० कोटी लोकांना लक्षात घेऊन लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये कंपनी एक केबल देखील देणार आहे जो टीव्हीला कनेक्ट करता येणार आहे. यामुळे फोनमधील गोष्टी तुम्ही मोठ्या स्क्रीनवर पाहू शकता.