IT क्षेत्रात मोठ्या संकटाची चाहूल? कॉग्निझंटच्या चार अधिकाऱ्यांना पाठवली नोटीस

Wipro vs Cognizant : कोरोना काळात अनेकांच्या नोकरीवर टांगती तलवार होती. परिणामी अर्थव्यवस्थेचं चक्र ठप्प झाले असल्याने अनेकांना नोकरीवरुन डच्चू देण्यात आला होता. तसेच अनेकांच्या वेतनाला कात्री लावण्यात आली होती. अशातच आता देशातील आयटी क्षेत्रात वेगळेच युद्ध सुरु झाले आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Dec 29, 2023, 01:03 PM IST
IT क्षेत्रात मोठ्या संकटाची चाहूल? कॉग्निझंटच्या चार अधिकाऱ्यांना पाठवली नोटीस  title=

Cognizant vs Other IT firms continues : कोरोनाच्या काळात सुरु झालेली नोकरीवरची टांगती अजूनही सुरूच आहे. देशातील आयटी क्षेत्रात आलेल्या जागतिक मंदीच्या भीतीने कर्मचारी चिंतेत आले आहे. इन्फोसिससह अनेक मोठ्या कंपन्यांनी यंदा पगार वाढवला नाही. तसेच पदोन्नतींची संख्या देखील कमी केली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचारी निराश आहेत. त्यातच आता आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिसचे (infosys) अध्यक्ष रवी कुमार एस (अध्यक्ष रवी कुमार) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  राजीनाम्यामागचे कारण कंपनीने स्पष्ट केलेले नाही.

येत्या काही दिवसांत देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये असे आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण इन्फोसिसने नुकतीच कॉग्निझंटला नोटीस पाठवली आहे. या आठवड्याच विप्रोने कॉग्निझंटमध्ये सामील समूहाबद्दल त्यांच्या दोन माजी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

काही दिवसांपूर्वीच विप्राच्या मुख्य वित्त अधिकारी अधिकाऱ्याने राजीनामा देऊन ‘कॉग्निझंट’मध्ये रुजू झाले होते. यावरुन विप्राने कॉग्निझंटला नोटीस दिली आहे. दुसरीकडे इन्फोसिसचे वरिष्ठ कर्मचारी कॉग्निझंटमध्ये रुजू झाले. काही दिवसांपूर्वीच विप्रोने आपल्या मुख्य वित्त अधिकाऱ्याने राजीनामा देऊन कॉग्निझंटंध्ये सामील समूहाबद्दल नोटीस पाठवली होती. आणि त्याच्या माजी CFO विरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. आता अशाच पद्धतीनंतर इन्फोसिसने कॉग्निझंटला नोटीस पाठवली आहे. इन्फोसिसच्या चार अधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन कॉग्निझंटमध्ये रूजू झाले आहेत. 

कॉग्निझंट अलीकडेच 20 पेक्षा जास्त लोकांना उच्च पदांवर नियुक्त केले आहे. इन्सिसिसचे माजी कार्यकारी आणि कॉग्निझंटचे सदस्य सीईओ रवी कुमार यांनी 20 सदस्यांची नियुक्ती केली आहे ज्यांना कार्यान्वित केले आहे. गेल्या एका वर्षात 15 उच्च अधिकारी विप्रो आणि इन्फोसिस सोडून गेले आहेत. कॉग्निझंटने आतापर्यंत इन्फोसिस अनुराग वर्धन सिंग, नागेश्वर चिरुकुपल्ली, नरसिंह राव मानेपल्ली आणि श्वेता अरोरा यांना उच्च पदासाठी नियुक्त केले आहे.