नवी दिल्ली : बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. बाईक खरेदी करताना आपण अनेकदा विचार करतो की, कोणती बाईक आपल्याला योग्य आहे. यासाठी आपण १० जणांचा सल्ला घेतो. त्यानंतरच कोणती बाईक घ्यायची हे ठरवतो. परंतु, २०१९ मध्ये अशा काही धमाकेदार बाईक लॉन्च होणार आहेत की त्या बघितल्यावर लगेच पसंद पडतील. या बाईक नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. बाईक चाहत्यांनी अगोदरच त्यांच्या आवडीची बाईक बुक करुन ठेवली आहे. पाहुया त्या बाईकचे नावे, फिचर आणि किंमत.
केटीएम २०० ड्युक एबीएस
केटीएमच्या या बाईकमध्ये १९९.५ सीसी इंजिन देण्यात आले आहे. सिंगल सिलिंडर आणि लिक्विड कुल्ड आहे. त्यामुळे ८ हजार आरपीएम ( रेव्ह्युल्युशन पर मिनिट ) वर १९.२ पीक टॉर्क जनरेट करणार आहे. या बाईकमध्ये ६ स्पीड गिअरबॉक्स लावण्यात आले आहेत. केटीएम २०० ड्युक एबीएसची किंमत १ लाख ६० हजार आहे. एबीएस व्हर्जन नसलेली बाईकची किंमत १ लाख ५१ हजार आहे.
रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर ६५०
रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर ६५० या बाईकमध्ये ६४८ सीसी इंजिन देण्यात आले आहे. त्यामुळे ५२५० आरपीएम वर ५२ पीक पॉवर जनरेट करणार आहे. बाईकमध्ये ६ गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर ६५० या बाईकची किंमत २ लाख ५० हजार आहे.
जावा आणि जावा-४२
जावा मोटरसायकल कंपनीने या दोन्ही बाईकमध्ये २९३ सीसी इंजिन दिले आहे. त्याचबरोबर लिक्विड कुल्ड, सिंगल सिलिंडर, डीओएचसी यासारखी सुविधा देण्यात आली आहे. जावा बाईकची किंमत १ लाख ६४ हजार रुपये आहे. तसेच जावा- ४२ बाईकची किंमत १ लाख ५५ हजार रुपये आहे.
कावासाकी ६५०
कावासाकी ६५० या बाईकमध्ये ६४९ सीसी इंजिन देण्यात आले आहे. यासोबत पॅरेलल-ट्विन, लिक्विड कुल्ड देण्यात आले आहे. ही बाईक ७ हजार आरपीएमवर ६४ पीक टॉर्क पॉवर जनरेट करणार आहे. बाईकमधील फ्रंट फॉर्क आणि प्रिलोड-ऍडजेस्टेबल रिअर मोनोशॉक अपग्रेड करण्यात आले आहे. यात २५० मिलीमीटरचा रिअर डिस्क देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर यात ड्युअल चॅनल एन्ट्री ब्रेकिंग सिस्टिम फिचरचा समावेश करण्यात आला आहे. कावासाकी ६५० बाईकची किंमत ६ लाख ६९ हजार रुपये आहे.