Online Fraud: 550 रुपयांच्या बॉटलसाठी गेले 5.35 लाख रुपये, महिलेसोबत घडला 'हा' प्रकार

दारू खरेदी करणाऱ्या महिलेला होम डिलिव्हरीच्या नावाखाली 5.35 लाखांचा गंडा 

Updated: Aug 12, 2022, 06:08 PM IST
Online Fraud: 550 रुपयांच्या बॉटलसाठी गेले 5.35 लाख रुपये, महिलेसोबत घडला 'हा' प्रकार  title=

मुंबई: आजच्या हायटेक काळात इंटरनेटच्या वारपरामुळे कामं सोप्पी झाली आहे. तर दुसरीकडे ऑनलाइन व्यवहार (online transactions) आल्यानंतर हॅकर्स देखील सक्रिय झाले असून Online फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत.   घरबसल्या आपल्या स्मार्टफोनवर आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी काही क्लिकवर मिळतो. पण त्याच वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन पेमेंटच्या (online payment) जमान्यात फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. असाच एक ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार समोर आला असून महिलेची 550 रुपयांची दारू पोहोचवण्याच्या नावाखाली भामट्यांनी 5.35 लाख रुपयांची फसवणूक केली.
  
मुंबईमधील दहिसर येथील (dahisar) 27 वर्षीय महिलेची फसवणूक करणारा व्यक्ती स्वत:ला दारूच्या दुकानाचा मालक असल्याचे सांगत होता. त्याने महिलेला व्हिस्कीची बाटली (whiskey bottle) त्यांच्या घरी पोहोचवण्यास सांगितले. त्यानंतर क्यूआर कोड पाठवून आधी 550 रुपये घेतले. नंतर हळूहळू महिलेकडून त्याच्या डेबिट कार्डची संपूर्ण माहिती घेतली. यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी महिलेच्या खात्यातून 5.35 लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, रात्री नऊच्या सुमारास त्यांना केक सजवण्यासाठी व्हिस्कीची बाटली लागली. महिलेने ऑनलाइन सर्च केल्यावर तिला एक पर्याय दिसला. यानंतर महिलेने फोन करून एका पुरुषाशी बोलले. त्या व्यक्तीने दारूच्या दुकानात सेल्स एक्झिक्युटिव्ह (Sales Executive) म्हणून स्वतःची ओळख दिली. सध्या दुकान बंद आहे, पण तो 10 मिनिटांत दारूची बाटली घरी पोहोचवू शकतो. त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला पेमेंटसाठी QR कोड पाठवला, त्यावर महिलेने 550 रुपये दिले. 

त्यानंतर या महिलेला दुसऱ्या व्यक्तीचा फोन आला आणि त्यांनी स्वत:चे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून ओळख दिली. घरपोच दारू पोहोचवण्यासाठी नोंदणी करावी लागेल, असे त्यांनी महिलेला सांगितले. काही वेळाने दुसऱ्या एक्झिक्युटिव्हने महिलेला बोलावले. त्याने महिलेला गुगल पे या पेमेंट सर्व्हिस अॅपवर जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याने महिलेला पैसे भरण्याच्या ठिकाणी पावती क्रमांक 19,051 टाकण्यास सांगितले. असे करताना महिलेच्या खात्यातून 19,051 रुपये ट्रान्सफर करण्यात आले. महिलेने हा प्रकार त्या पुरुषाला सांगितला. त्यावर ते म्हणाले की, यंत्रणेत काही अडचण आहे. यामुळे हे घडले आहे. हस्तांतरित केलेले पैसे मिळविण्यासाठी, त्याला पुन्हा एकदा तीच प्रक्रिया अवलंबावी लागेल. महिलेने पुन्हा तेच केले आणि तिच्या खात्यातून पुन्हा 19,051 रुपये ट्रान्सफर झाले. याबाबत महिलेने सेल्स एक्झिक्युटिव्हला सांगितले.

मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेल्स एक्झिक्युटिव्हने पैसे परत करण्याच्या बहाण्याने महिलेकडून बँक डिटेल्स घेतले. महिलेने कार्ड नंबर, सीव्हीव्ही अशी सर्व माहिती त्याला पुरवली. तसेच तुमच्या कार्डची मर्यादा वाढवली. यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी महिलेच्या खात्यातून प्रथम 48,000 आणि नंतर 96,045 रुपये काढले. त्यावर त्याने पुन्हा महिलेला सर्व पैसे परत करणार असल्याचे बोलून त्याने महिलेला 96,051 आणि 1,71,754 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. अशाप्रकारे अवघ्या 12 तासांत फसवणूक करणाऱ्यांनी महिलेच्या खात्यातून 5.35 लाख रुपये काढून घेतले.