2022 Maruti Brezza 2022 दहा प्रकारात होणार लॉन्च! जाणून घ्या

मारुती सुझुकी 30 जून 2022 रोजी ब्रेझाचं अपडेटेड वर्जन लॉन्च करणार आहे.

Updated: Jun 28, 2022, 05:22 PM IST
2022 Maruti Brezza 2022 दहा प्रकारात होणार लॉन्च! जाणून घ्या title=

2022 Maruti Suzuki Brezza Variants: मारुती सुझुकी 30 जून 2022 रोजी ब्रेझाचं अपडेटेड वर्जन लॉन्च करणार आहे. यासह कंपनी एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. लान्चिंगपूर्वीच नवीन ब्रेझाचे सर्व तपशील समोर आले आहेत. आता नवीनतम मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 मारुती ब्रेझा एसयूव्ही हायब्रिड इंजिनसह येईल आणि एकूण 10 प्रकारांमध्ये येईल, असं सांगण्यात येत आहे.

वृत्तानुसार, ही माहिती ICAT मानेसरने जारी केलेल्या टाइप अप्रुवल प्रमाणपत्रावरून समोर आली आहे.  नवीन ब्रेझामध्ये K15C इंजिन असेल, जे फेसलिफ्टेड Ertiga आणि XL6 मध्ये आहे. हे माइल्ड-हायब्रिड तंत्रज्ञानासह येईल. त्याचे इंजिन 103PS पॉवर आणि 137Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. यानुसार, ब्रेझाचे एकूण 10 प्रकार असतील, त्यापैकी 7 मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकार असतील आणि 3 स्वयंचलित ट्रांसमिशन प्रकार असतील. मॅन्युअल  LXI, LXI (O), VXI, VXI (O), ZXI, ZXI (O) आणि ZXI+ वेरिएंट पर्याय असतील. तर  VXI, ZXI आणि ZXI+ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय असतील.

नवीन मारुती सुझुकी ब्रेझामध्ये 360 डिग्री पार्किंग कॅमेरा उपलब्ध असेल. यामुळे एसयूव्हीच्या किमतीत पूर्वीच्या तुलनेत थोडी वाढ होणार आहे. यात इलेक्ट्रिक सनरूफही मिळेल. इलेक्ट्रिक सनरूफ मिळवणारी ही मारुतीची भारतातील पहिली कार असेल. यात हेड-अप डिस्प्ले (HUD) मिळेल. कंपनीने याआधी नवीन बलेनोमध्येही हे दिले आहे.

याशिवाय मारुती सुझुकीने नवीन ब्रेझा सुरक्षित करण्यासाठी अनेक सेफ्टी फीचर्स दिले आहेत. कारमध्ये सहा एअरबॅग असणार आहेत. इतकेच नाही तर नवीन 2022 मारुती सुझुकी ब्रेझाला अॅप सपोर्टद्वारे 40 पेक्षा जास्त कनेक्टेड फंक्शन्ससह मोठी 9.0-इंच स्मार्टप्ले प्रो+ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल.