होंडाने लॉन्‍च केली नवी स्वस्त बाईक

पाहा किती आहे किंमत

Updated: Jul 16, 2018, 02:42 PM IST
होंडाने लॉन्‍च केली नवी स्वस्त बाईक title=

मुंबई : जर तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आज 2018 CD 110 Dream DX गाडी लॉन्च केली आहे. दिल्लीमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत 48,641 रुपये आहे. सीडी 110 ड्रीम डीएक्स 2018 बाईकमध्ये गोल्ड ग्राफिक्स देण्यात आलं आहे. ही बाईक हेवी ड्यूटी रियर कॅरियर सोबत असणार आहे. लांब सीट आणि व्हीलबेस सुविधा या बाईकमध्ये असणार आहे.

या बाईकमध्ये 110 सीसी एचईटी (होंडा ईको टेक्नोलॉजी) इंजिन लावण्यात आलं आहे. या बाईकला चांगला प्रतिसाद मिळेल असा कंपनीला विश्वास आहे. बाईकच्या इंजिनमध्ये 4 स्‍पीड मॅन्यूअल गियरबॉक्‍स देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, या मोटरसायकलची टॉप स्‍पीड 86 किलोमीटर प्रति तास आहे.  2018 होंडा सीडी 110 ड्रीम डीएक्‍स चार रंगामध्ये येते.