ऐ दिल है मुश्किल मनसेचा हिरवा कंदील, शिवसेनेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्कीलच्या रिलीजला मुख्यमंत्री आणि मनसेनं जरी हिरवा कंदिल दिला असला तरी शिवसेनेचा या चित्रपटाला विरोध कायम याहे.. चित्रपटाच्या रिलीज संबंधीत झालेल्या बैठकीतील निर्णयावर शिवसेनेनं शंका उपस्थित केल्या आहेत.

Updated: Oct 23, 2016, 07:57 AM IST
ऐ दिल है मुश्किल मनसेचा हिरवा कंदील, शिवसेनेचा विरोध कायम title=

मुंबई : ऐ दिल है मुश्कीलच्या रिलीजला मुख्यमंत्री आणि मनसेनं जरी हिरवा कंदिल दिला असला तरी शिवसेनेचा या चित्रपटाला विरोध कायम याहे.. चित्रपटाच्या रिलीज संबंधीत झालेल्या बैठकीतील निर्णयावर शिवसेनेनं शंका उपस्थित केल्या आहेत.

पाकिस्तानी कलाकार असलेल्या ए दिल है मुश्कील चित्रपटावर सुरु असलेलं आंदोलन मनसेनं मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी सैन्य कल्याणनिधीत प्रत्येकी पाच करोड रुपये जमा करण्यावर समझौता केला. राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे शहीद जवानांचा अपमान केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.