दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं 7 हजार कोटींच्या पॅकेज जाहीर केलंय. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केलीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं तीन महिन्याचं वीज बिल आणि पीक कर्जावरील व्याज माफ करण्याचीही घोषणा करण्यात आलीय. 

Updated: Dec 11, 2014, 05:06 PM IST
दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर  title=

नागपूर: दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं 7 हजार कोटींच्या पॅकेज जाहीर केलंय. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केलीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं तीन महिन्याचं वीज बिल आणि पीक कर्जावरील व्याज माफ करण्याचीही घोषणा करण्यात आलीय. 

तसंच शेतकऱ्यांकडे असलेलं वैध सावकरांचं कर्जही राज्य सरकार भरणार आहे. राज्यात पाच लाख शेतकरी सावकारी कर्जात आहेत. त्यांचं कर्ज सरकार फेडणार असून पीक कर्जाचं व्याजही सरकार भरणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी जाहीर केलं.
 
राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 3925 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. दरम्यान, राज्यातील दुष्काळ मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पोहोचला आहे. त्यामुळे 14 आणि 15 डिसेंबरला केंद्रीय पथक दुष्काळाच्या पाहणीसाठी राज्यात येणार आहे.

दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी यासह अनेक घोषणांचा पाऊस राज्य सरकारनं पाडलाय. मात्र जाहीर केलेली पूर्ण मदत दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहचणार का? याकडे आता लक्ष लागलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.