wasim akram

लाईव्ह शोदरम्यान वसीम अक्रम यांना कॅमेऱ्यासमोरून हटवलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमांचक सामन्यादरम्यान एका टीव्ही चॅनेलवर धक्कादायक घटना घडली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वसीम अक्रम एका चॅनेलवर लाईव्ह बातचीत करत होते. यादरम्यान काही लोक कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांना तेथून हटवले. यानंतर काय घडले हे चॅनेलने पुढे दाखवले नाही. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

Mar 28, 2016, 09:42 AM IST

वसीम अक्रमला राग का आला

आशिया चषकातील पाकिस्तानच्या पराभवानंतर काही महिला आणि विद्यार्थ्यांनी पाक संघाचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो विद्रूप करुन पोस्टर्स तयार केले. हे पोस्टर्स पाहून पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज अक्रम कमालीचा संतप्त झाला.

Mar 6, 2016, 08:50 PM IST

भारत-पाक मॅच कोण जिंकणार, अक्रमने व्यक्त केले भाकीत

 येत्या रविवारी ढाकामध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार यावर बेटिंग सुरू असले तरी या सामन्याचे भाकीत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने व्यक्त केले आहे. 

Feb 23, 2016, 07:18 PM IST

पाहा पाकिस्तानचे वसिम अक्रम, शोएब अख्तर काय म्हणतात सचिनबद्दल

भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे एकप्रकारचं युद्धच... दोन्ही देशांमध्ये या मॅचला खूप महत्त्व आहे. सचिन तेंडुलकर भारतात क्रिकेटचा देव... सचिनबद्दलच पाकिस्तानचे क्रिकेटपटू वसिम अफ्रम आणि शोएब अख्तर भरभरून बोललेत.

Nov 3, 2015, 03:52 PM IST

पाकिस्ताने खेळाडू अख्तर, अक्रम, पंच अलीम यांची माघार

क्रिकेट खेळात कोणीही राजकारण आणू नये, अस सल्ला देण्यात येतो. मात्र, क्रिकेटच्या मैदानात राजकीय आखाडात दिसून येत आहे. पाकिस्तानमधून वाढत्या भारतविरोधी कारवाया याला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे पाकिस्तान कलाकार, खेळाडू यांना विरोध शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळे वसिम अक्रम आणि शोएब अख्तरने कॉमेंट्रीला नकार दिलाय.

Oct 20, 2015, 11:41 AM IST

कसोटीच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्यात हरभजन नवव्या क्रमांकावर

भारत-बांग्लादेश कसोटी सामन्यादरम्यान हरभजन सिंग सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नवव्या क्रमांकावर आलाय. यापूर्वी या स्थानावर असलेल्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि जलदगती गोलंदाज वसिम अक्रमलाही त्यानं मागे टाकलंय.

Jun 15, 2015, 06:08 PM IST

अकरम म्हणतोय, अर्जुन तेंडुलकर ध्येयवेडा मुलगा

कोलकाता नाईट रायडर्सचे कोच आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अकरम यांनी नुकतीच मुंबईत मास्टर ब्लास्टरच्या सचिन तेंडुलकरच्या छोट्या मास्टरची म्हणजेच अर्जुन तेंडुलकरची भेट घेतली.

May 21, 2015, 01:44 PM IST

आयपीएल न खेळल्याने तोट्यात पाक-इंग्लड खेळाडू : वसीम अक्रम

आपले कौशल्याला धार देण्यासाठी आयपीएल हे चांगले व्यासपीठ आहे. पण यामुळे पाकिस्तान आणि इंग्लडच्या खेळाडूंचे खूप नुकसान होत असल्याचे पाकिस्तानचा माजी तेज गोलंदाज वसीम अक्रम याने म्हटले आहे. 

May 5, 2015, 07:46 PM IST

वसीम अकरम तिसऱ्यांदा बनणार पिता!

पाकिस्तानचा वरिष्ठ क्रिकेटर वसीम अकरम पुन्हा एकदा बाप बनणार आहे. अकरमची मूळ ऑस्ट्रेलियन पत्नी शानिएरा अकरम गर्भवती असल्याचं समजतंय.

Sep 2, 2014, 11:41 AM IST

वसीम अक्रमची सनीराने काढली विकेट

पाकिस्तानचा फास्टर बॉलर वसीम अक्रमने आपली ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंड सनीरा थॉमसन हिच्याशी विवाह बंधनात अडकला. याबाबत पाकिस्तानमधील वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्युनने वृत्त दिले आहे. तसेच निकाहचा फोटोही प्रसिद्ध केला आहे.

Aug 22, 2013, 01:04 PM IST

सुश्मिता सेनशी नाही, ऑसी ललनेशी अक्रमचे लग्न!

वसीम अक्रम आणि सुश्मिता सेन यांचे सूत जुळले आणि ते लग्न करणार अशा अफवा गेल्या काही महिन्यांपूर्वी पसरल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांना फाटा देत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने रिव्हर्स स्वींग टाकला आहे.

Jul 8, 2013, 04:13 PM IST

मी वसीमशी लग्न करत नाही- सुश्मिता सेन

वसीम अक्रमशी लग्न करणार नसल्याचं अभिनेत्री सुश्मिता सेनने स्पष्ट केलं आहे. वसीम हा माझा चांगला मित्र आहे, असं सुश्मिता सेनने म्हटलं आहे.

Apr 15, 2013, 08:54 PM IST

वसीम अक्रम सुष्मिता सेन लग्नबंधनात अडकणार?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि बॉलिवुडची अभिनेत्री सुष्मिता सेन लवकरच लग्न करणार आहे. त्यानंतर ते लवकरच दुबईमध्ये सेटल होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

Apr 12, 2013, 02:51 PM IST

सचिनने आत्ममंथन करावे- अक्रम

www.24taas.com, नवी दिल्ली
सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूला निवृत्ती घे, असे सांगणे निवडकर्त्यांना कठीण आहे. परंतु, या महान खेळाडूने या संदर्भात स्वतः निर्णय घेणे गरजेचे आहे.

Dec 12, 2012, 03:58 PM IST

कोहलीवर कर्णधारपदाचं ओझं नका टाकू - अक्रम

क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याच्यावर आत्ताच कर्णधारपदाची जबाबदारी टाकू नये असे स्पष्ट मत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम यांने व्यक्त केले आहे.

Oct 11, 2012, 04:46 PM IST