वसीम अकरम तिसऱ्यांदा बनणार पिता!

पाकिस्तानचा वरिष्ठ क्रिकेटर वसीम अकरम पुन्हा एकदा बाप बनणार आहे. अकरमची मूळ ऑस्ट्रेलियन पत्नी शानिएरा अकरम गर्भवती असल्याचं समजतंय.

Updated: Sep 2, 2014, 11:45 AM IST
वसीम अकरम तिसऱ्यांदा बनणार पिता! title=

नवी दिल्ली : पाकिस्तानचा वरिष्ठ क्रिकेटर वसीम अकरम पुन्हा एकदा बाप बनणार आहे. अकरमची मूळ ऑस्ट्रेलियन पत्नी शानिएरा अकरम गर्भवती असल्याचं समजतंय.
 
पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन वसीम अकरमनं ही बातमी स्वत:च सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवलीय. सोशल मीडिया ‘ट्विटर’ त्यानं ट्विट केलंय...

अकरमनं या ट्विटमध्ये म्हटलंय... ‘मला हे सांगताना खूप आनंद होतोय की माझी पत्नी शानिएरा आमच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद’...

अकरमचा पहिला विवाह 1995 साली हुमाशी झाला होता. हुमा-अकरमची दोन मुलं आहेत. पण, हुमाचं 25 ऑक्टोबर 2009 रोजी चेन्नईमध्ये मृत्यू झाला.  

यानंतर अकरमनं मेलबर्नमध्ये जन्मलेल्या शानिएरा हिच्याशी गेल्या वर्षी 12 ऑगस्ट रोजी विवाह केला होता.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.