team india

टीम इंडिया जिंकण्यासाठी धडपडतेय...

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन पुन्हा एकदा फ्लॉप ठरले आहेत. आतापर्यंत भारताच्या ७ विकेट गेल्या आहेत. गेल्या काही मॅचमध्ये प्रमुख बॅट्समननी साफ निराशाच केली आहे.

Feb 21, 2012, 04:29 PM IST

आव्हान २८८ रनचं, इंडियाची मात्र खराब सुरवात

ऑस्ट्रेलियाच्या २८८ आव्हांनाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरवात खराब झाली आहे. गेल्या दोन मॅचमध्ये चमकदार कामगिरी करणारा गंभीर झटपट बाद झाला.

Feb 19, 2012, 05:09 PM IST

ऑसींची सावध सुरवात, भारत करणार का मात?

भारत वि. ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये ऑस्टेलियाने प्रथम बॅटींग करत अगदी सावध सुरवात केली आहे. याआधीच्या भारताविरूद्धच्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाने ऑसींना लोळवले होते.

Feb 19, 2012, 05:09 PM IST

टीम इंडियासमोर २७० रन्सचे आव्हान

ऍडलिड इथे ट्राय सीरिजच्या भारताविरुद्धच्या वनडेत ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हर्समध्ये आठ बाद २६९ रन्सची मजल मारली. ऑस्ट्रेलियातर्फे डेव्हिड हसीने सर्वाधिक ७२ रन्सीची खेळी केली. तर पिटर फॉरेस्टने पदार्पणातच ६६ ची दमदार खेळी करुन आपली निवड सार्थ ठरवली.

Feb 12, 2012, 12:57 PM IST

टीम इंडियाचं काही खरं नाही....

भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे मॅचमध्ये भारताने पुन्हा एकदा नांगी टाकण्यास सुरवात केली आहे भारतातर्फे पहिले आघाडीचे आणि मधल्या फळीतील खेळाडू फक्त हजेरी लावण्याचे काम करत गेले. भारताची चौथी विकेट गेल्यानंतर सुरैश रैना हा देखील फक्त हजेरी लावण्याचे काम करून गेला.

Feb 5, 2012, 05:17 PM IST

इंडिया-ऑस्ट्रेलिया आज दुसरा टी-२० सामना

भारतीय क्रिकेट टीमचा दुसरा टी-२० सामना आज मेलबर्न येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय टीम जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. कसोटी मालिकेत पराभून झाल्यानंतरही पहिला टी-२० सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला होता.भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात तिरंगी मालिका होणार आहे. त्यामुळे भारताला आजच्या टी-२० सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. हाच आत्मविश्वास टीम इंडियाला तिरंगी मालिकेसाठी लाभदायक ठरणारा असेल.

Feb 3, 2012, 10:21 AM IST

टी-२० चा संग्राम शुक्रवारी!

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसरी टी-20 मॅच शुक्रवारी खेळण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये आतापर्यंत एकही मॅच न जिंकलेल्या टीम इंडियासमोर कांगारूंना पराभूत करण्याचं कडव आव्हान असणार आहे. तर कांगारूं ही मॅच जिंकून टी-20 सीरिजही खिशात घालण्यासाठी सज्ज आहेत.

Feb 2, 2012, 07:44 PM IST

द्रविड बाद, टीम इंडिया पुन्हा ढेपाळली

अॅडलेड टेस्टमध्ये जिथे ऑस्ट्रेलियाने जबरदस्त बॅटींगचा नमुना पेश केला त्याच अॅडलेड टेस्टमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन पुन्हा एकदा ढेपाळले आहेत फक्त पहिल्या ५० रन्सच्या आतच टीम इंडियाचे दोन महत्त्वाचे फंलदाज तंबूत परतले.

Jan 25, 2012, 01:38 PM IST

टीम इंडियांची इज्जत बचाव

ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाला सपाटून मार खावा लागतो आहे. यामुळे धोनी अँड कंपनीवर चोहूबाजूंनी टीका होते आहे. आणि आता ऍडलेड टेस्ट टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरणार आहे.

Jan 20, 2012, 11:31 PM IST

टीम इंडियाची ब्रँड व्हॅल्यू घसरली

इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियातही टीम इंडियाचा धुव्वा उडाल्यानंतर टीम इंडियावर जोरदार टीका होतं आहे. याच क्रिकेटपटूंना आता आणखी एक धक्का बसलाय. पराभवाच्या मालिकेमुळे क्रिकेटपटूंची ब्रँड व्ह्यॅल्यूही घसरली आहे

Jan 17, 2012, 10:49 PM IST

ऑस्ट्रेलियन मीडियाचे टीम इंडियावर ताशेरे

ऑस्ट्रेलियन मीडियानं टीम इंडियावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महेंद्रसिंग धोनी निष्क्रिय कॅप्टन असल्याच म्हणत त्यांनी धोनीलाही टीकेच लक्ष्य केलं आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणनं कांगारु बॉलर्ससमोर सपशेल शरणागती पत्करली आहे.

Jan 17, 2012, 02:10 PM IST

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज शतकवीर तंबूत

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज शतकवीर डेव्हिड वॉर्नरनंची खेळी १८० रन्सवर संपुष्टात आली. ईशान शर्माने उमेश यादवकडे कॅच देण्यास भाग पाडून विकेट पदरात पाडली. ऑस्ट्रेलियाची स्थिती चार बाद २९७ रन्स आहे.

Jan 14, 2012, 04:20 PM IST

ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

पर्थ टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये ३६९ रन्स केले. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स धावांचा डोंगर उभा करणार असे वाटत असताना टीम इंडियाच्या बॉलर्सनी शेवटी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स झटपट बाद करत त्यांची खेळी ३६९ रन्सवर रोखली.

Jan 14, 2012, 03:47 PM IST

सचिन बाद, टीम इंडियाकडून निराशा

टीम इंडियाकडून पुन्हा निराशा झाली. सचिन तेंडुलकरला ८ रन्सवर संशयास्पद बाद देण्यात आले. खुद्द सचिनने नाराजी व्यक्त केली. ८५ रन्सच्या बदल्यात ४ विकेट टीम इंडियाने गमावल्यात.

Jan 14, 2012, 03:33 PM IST

ऑस्ट्रेलियाला दिला दणका

ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स धावांचा डोंगर उभा करणार असे वाटत असताना टीम इंडियाच्या बॉलर्सनी शेवटी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स झटपट बाद केलेत. ऑस्ट्रेलियाची स्थिती ९ विकेट ३६१ रन्स अशी आहे.

Jan 14, 2012, 02:06 PM IST