भाजपमध्ये गोंधळ, जसवंत सिंगांची जोरदार टीका
भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग राजस्थानमधल्या बारमेरमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारी नाकारल्यानं पक्षावर नाराज असलेले जसवंत सिंह उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. `अँडजस्ट करुन घ्यायला मला काय फर्निचर समजताय का ?, अशा कडक शब्दात जसवंत सिंह यांनी आपला संताप व्यक्त केलाय.
Mar 23, 2014, 08:17 PM ISTलालकृष्ण अडवाणी रुसलेत अन्...
भाजपमध्ये नरेंद्र मोदी फिवर असताना दिल्लीत मात्र, अस्वथ आहे. दिल्लीतील लालकृष्ण अडवाणी यांच्या घराचे उंबरठे भाजपचे वरिष्ठ नेते झिजवत असल्याचे दिसून आले आहे. अडवाणी ज्या ठिकाणांहून आतापर्यंत निवडून येत आहेत तेथून निवडणूक लढण्यास त्यांनी चक्क नकार दिलाय. परंतु भाजप त्याच जागेवर अडून बसले आहे. त्यामुळे अडवाणी रुसून बसलेत. त्याचा रुसवा काढण्यासाठी नेत्यांची पळापळ सुरू आहे.
Mar 20, 2014, 02:10 PM ISTट्विटर युद्ध: ‘मोदींपेक्षा सुषमा चांगल्या तर राहुल पेक्षा दिग्विजय’
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलंच ट्विटर युद्ध रंगलंय. नरेंद्र मोदींना अहंकारी, मनोरुग्ण आणि खोटारडे म्हणत काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी ट्विटर युद्धाला सुरूवात केली. भाजपामध्ये नरेंद्र मोदींपेक्षा सुषमा स्वराज या चांगल्या पंतप्रधान होतील असं दिग्विजय सिंह म्हणाले. तर यावर उत्तर देत सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींपेक्षा दिग्विजय चांगले उमेदवार असं म्हटलंय.
Oct 28, 2013, 08:19 AM ISTनरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी एकाच व्यासपीठावर ?
मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये भाजपचा महाकुंभमेळा भरणार आहे. इथं नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर या सभेच्या निमित्ताने मोदी- लालकृष्ण अडवाणी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.
Sep 25, 2013, 11:55 AM ISTमोदी खरंच पंतप्रधान होतील का?
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. भाजपने मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असलं, तरी ते खरोखरच पंतप्रधान होऊ शकतात का?
Sep 13, 2013, 08:39 PM ISTबाळासाहेबांची भूमिका सेनेने सोडली, मोदींना पाठिंबा
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी सुषमा स्वराज यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं आज आपली भूमिका बदलली... शिवसेनेनं अखेर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय.
Sep 13, 2013, 08:03 PM ISTभाजपचे नमो नमः, मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार
भारतीय जनता पक्षाने आगामी २०१४च्या निवडणुकीसाठी एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली आहे.
Sep 13, 2013, 07:01 PM ISTपंतप्रधानांच्या खुर्चीत सुषमा स्वराज बसतात तेव्हा...
भारतीय निवडणूक अभियान समिती अध्यक्ष नरेंद्र मोदी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले असले तरीही किंवा त्यांच्याकडे पाहिले जात असले तरी मंगळवारी काहीकाळ पंतप्रधान खुर्चीवर सुषमा स्वराज बसल्या.
Aug 20, 2013, 01:38 PM ISTसंसदेतील गोंधळाला सोनिया गांधी जबाबदार - सुषमा
संसदेमध्ये सध्या होत असलेल्या गोंधळाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी जबाबदार आहेत, असा थेट आरोप लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केलाय.
Apr 30, 2013, 08:49 PM IST..तर १० शीर कापून आणा - सुषमा स्वराज
भाजप नेता सुषमा स्वराज यांनी सोमवारी म्हटलं की, जर पाकिस्तान शहीद हेमराज याचं शिर परत करणार नसेल तर भारताने पाकिस्तानची १० शिर कापून आणले पाहिजे.
Jan 15, 2013, 11:32 AM ISTमाया-मुलायमुळे सरकार तरले, देशाच्या माथी FDI!
रिटेल क्षेत्रात एफडीआयच्या सरकारच्या निर्णयावर मतदान होण्यापूर्वीच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने लोकसभेतून वॉकऑऊट केल्यामुळे सरकार तरले आहे. समाजवादी पक्षाकडे २२ खासदार आहेत तर बसपकडे २१ खासदार आहेत.
Dec 5, 2012, 07:13 PM ISTलोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी
लोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी मिळाली. त्यामुळे केंद्रातील युपीए सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपसह प्रमुख विरोधी पक्षांनी सुरूवातीपासून विरोध केला होता. यामध्ये भाजपने कडाडून विरोध करत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी जोरदार ताशेरे ओढले होते.
Dec 5, 2012, 07:09 PM ISTएफडीआयमुळे बेरोजगार वाढेल - भाजप
एफडीआयच्या मुद्दावर संसदेच्या सभागृहात जोरदार विरोध करत भाजपने आक्षेप घेतला. मल्टिब्रँड रिटेलमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीमुळे शेतकऱ्यांची कोंडी होईल. त्यामुळे एफडीआय कोणाच्याही फायद्याचं नाही. रिटेल क्षेत्रात एकाधिकारशाही वाढेल, त्यामुळे एफडीआयचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केली
Dec 4, 2012, 08:22 PM ISTमोदीच पंतप्रधानपदासाठी योग्य- सुषमा स्वराज
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी म्हटलंय. भाजपमध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारांची कुठलीही यादी नाही. मोदी हे सर्वार्थानं त्या पदासाठी योग्य असल्याचं स्वराज यांनी म्हटलंय.
Dec 1, 2012, 07:38 PM ISTपंतप्रधानपदासाठी स्वराज योग्य व्यक्ती - ठाकरे
विरोधी पक्षनेत्या आणि भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं मत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. सामनातील मुलाखतीत बाळासाहेबांनी हे मत व्यक्त केलंय.
Sep 9, 2012, 12:51 PM IST