shumayana

राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू ठरली तीन तलाखची बळी

उत्तर प्रदेशमध्ये राहणारी शुमायना ही राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू तीन तलाखची बळी ठरली आहे. या खेळाडूला तिच्या नवऱ्याने व्हॉट्सअॅपवरुन तलाख दिला आहे. अमरोहा शहरातील मुहल्ला पीरजादामधील जावेद इकबाल यांची ती मुलगी आहे. शुमायनाने नेटबॉलमध्ये सात वेळा नॅशनल आणि चार वेळा ऑल इंडिया स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ती एक चांगली खेळाडू असल्याने तीला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

Apr 24, 2017, 01:08 PM IST