sharad pawar

शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

सिंचनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. आघाडी सरकार चालवणं ही एक कला आहे. आम्ही 1978 साली आघाडी सरकार चालवलं, पण कुरघोडी केली नाही. तसंच केंद्रात आम्ही सात आठ वर्षं एकत्र आहोत, पण एकमेकांवर कुरघोड्या केल्या नाहीत.

May 5, 2012, 07:09 PM IST

नवा जमीन घोटाळा, पुन्हा पवारांचाच गोतावळा!

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या कुटुंबियांवर पुन्हा एकदा जमिनीच्या गैरव्यवहाराचा आरोप होतोय. जिल्हाधिका-यांचा बनावट आदेश तयार करून महार वतनाची जमीन लाटल्याचा आरोप शर्मिला पवार यांच्यावर करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या शर्मिला पवार या पत्नी आहेत.

May 4, 2012, 07:18 PM IST

दुष्काळात '१३व्या'चे राजकारण

सुरेंद्र गांगण

महाराष्ट्रातील दुष्काळावर उपाययोजना करण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवून दुष्काळाच्या प्रश्नावरुन राजकारण केले गेले आहे. दुष्काळ सोडविण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. केवळ दौरे करून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राजकीय नेतेमंडळी करीत आहेत.

May 4, 2012, 09:44 AM IST

कापूस निर्यातीवरील बंदी मागे

केंद्र सरकारने कापूस निर्यातीवर घातलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय कॅबिनेटच बैठकीत घेतला. त्यामुळे यंदा कापसाची विक्रमी निर्यात होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ११५ लाख गाठींची निर्यात झाली आहे. आता आणखी २० लाख गाठींची निर्यात करण्यात येणार आहे.

May 1, 2012, 09:46 AM IST

पवारांची नाराजी : पंतप्रधानांनी बोलावली बैठक

कापूस आणि साखर निर्यात धोरणाबाबत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आज पंतप्रधानांनी कॅबिनेटची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Apr 30, 2012, 02:06 PM IST

काळे झेंडे शरद पवारांसाठी

श्रीरामपूरमध्ये शऱद पवारांना काळे झेंडे दाखवले आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस प्रश्नावर पवारांना काळे झेंडे दाखवले आहेत. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

Apr 29, 2012, 07:39 PM IST

शरद पवार भेटणार सोनिया गांधींना!

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या चर्चा करणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निश्चितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Apr 25, 2012, 04:34 PM IST

शरद पवार मंत्र्यांना घालतायेत पाठिशी?

कॅगच्या अहवालात राज्य़ातल्या हेवीवेट मंत्री आणि नेत्यांवर ताशेर ओढण्यात आले आहेत. पण केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र या मंत्र्यांची पाठराखण केली आहे. ,

Apr 8, 2012, 01:01 PM IST

शरद पवारांच्या रडारावर राज्यपाल, मुख्यमंत्री

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्यपालांना फटकारले आहे. तर मजुरांसोबत बसून जेवण केले म्हणजे विकासाचे प्रश्न सुटत नाही, असे म्हणत पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला आहे

Apr 4, 2012, 10:09 PM IST

'लवासा'चा गुन्हा, सरकारला लावला करोडोंचा चुना

लवासा कार्पोरेशननं राज्य सरकारलाही ४८ कोटींचा चुना लावल्याचं आता स्पष्ट झालंय. बेकायदा उत्खनन करुन लवासानं १६ कोटींचा महसूल बुडवल्याचं राज्य सरकारनंही मान्य केलंय.

Mar 30, 2012, 09:41 PM IST

आघाडीत बिघाडी?

पवारांच्या वक्तव्याला काँग्रेसनं उत्तर दिलं आहे. पुढच्या निवडणूकीत आघाडी ठेवायची की नाही याचा विचार करु, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलाय.

Mar 24, 2012, 10:08 PM IST

मोदी-पवार नव्या राजकीय समीकरणाचे संकेत

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी लवासाला अचानक दिलेली भेट. तसचं लवासाचे प्रवर्तक हिंदुस्थान कन्स्ट्रकशन कंपनीला (एचसीसी) गुजरातमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी दिलेल्या आमंत्रणामुळे महाराष्ट्र प्रदेश भाजपला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Mar 22, 2012, 09:29 PM IST

शरद पवार नीच माणूस – बाळासाहेब ठाकरे

नाशिकमध्ये शरद पवारांचा हलकटपणा दिसून आला. या निच माणसाने घालच्या स्तरावरील राजकारण केलं आहे, अशी बोचरी टीका करताना याला आम्ही कधीही माफ करणार नाही, असा इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला.

Mar 17, 2012, 11:21 PM IST

...अन् लोकसभेत शरद पवारांना आली चक्कर

लोकसभेच्या अधिवेशन सुरूवात झाली. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच लोकसभेत भाषण करताना केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना चक्कर आली. लोकसभेचे कामकाज सुरू असताना शरद पवार यांना चक्कर आली.

Mar 13, 2012, 12:49 PM IST

कापसाबाबत निर्णयास विलंब - शरद पवार

कापसावरील निर्यातबंदी लवकरच उठवली जाण्याचे संकेत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले आहेत. कापसाच्या निर्यातबंदीच्या निर्णयाला शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा खळबळजनक आरोप शरद जोशींनी केला होता त्याला प्रत्युत्तर देताना हे पोरकटपणाचे आरोप असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. काही राज्यांमध्ये निवडणुका सुरु असल्याकारणाने निर्णय घेण्यात विलंब झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Mar 10, 2012, 07:52 PM IST