बाबा सिद्धीकी कोणती कार वापरायचे? बुलेटप्रूफ कारमध्ये कशी शिरली गोळी?

Baba Siddique Car:  बाबा सिद्धीकी यांची हत्या झाली तेव्हा ते कोणत्या कारमध्ये होते?

Pravin Dabholkar | Updated: Oct 14, 2024, 02:19 PM IST
बाबा सिद्धीकी कोणती कार वापरायचे? बुलेटप्रूफ कारमध्ये कशी शिरली गोळी? title=
बाबा सिद्दीकी कोणत्या कारमध्ये होते?

Baba Siddique Car: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीक यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शनिवार, 12 ऑक्टोबरच्या रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईतील वांद्रे येथे बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला. त्यावेळी ते कारमध्ये बसले होते. बाबा सिद्दीकी यांची ही कार बुलेटप्रूफ होती.यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. पण बाबा सिद्धीकी कोणती कार वापरायचे?  कार बुलेट प्रूफ असूनही पिस्तुलातून सुटलेली गोळी कारची काच फोडून बाबा सिद्दीकी यांच्या अंगावर कशी आदळली? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

साधारण 8.45 च्या सुमारास झिशांत सिद्दीकी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत कार्यालयाबाहेर पडले आणि खेरवाडीच्या दीशेनं गेले. झिशांत सिद्दीकींपाठोपाठ बाबा सिद्दीकीही कार्यालयातून घरी जाण्यास निघाले. त्यांची कार कार्यालयापासून काही मीटर अंतरावर पार्क केली होती.झिशांत सिद्दीकी जाताच अवघ्या ३ ते ४ मिनीटांत बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाला.सुरुवातीला लोकांमधून `चोर चोर´ असा आवाज आला, बंदोबस्ताचे स्थानिक पोलिसआवाजाच्या दीशेनं धावले. काही लोक चोर चोर म्हणत आरोपींचा पाठलाग करत असतांना  गोळीबारानंतर एका आरोपीला तात्काळ रंगेहाथच पकडण्यात आलं. या पहिल्या आरोपीकडे 1 पिस्टल आणि 12 राऊंड सापडले. दुसरा आरोपी जवळच असलेल्या एका गार्डनमध्ये शिरला, या आरोपीनं पिस्तुल जवळच फेकुन दिले.गार्डनमध्ये लपलेल्या या आरोपीलाही पोलिसांनी रात्री 9.50 पर्यंत पकडले.या दुसऱ्या आरोपीकडेही पिस्तुल होते आणि त्याच्या बॅगेत 4 राऊंड सापडले.तिसरा आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत पळून गेला. बाबा सिद्दीकींसोबतच्या एका कार्यकर्त्याच्या पायालाही गोळी लागली.

बाबा सिद्दीकी कोणत्या गाडीत होते?

बाबा सिद्दीकी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये बाबा सिद्दीकी रेंज रोव्हर कारमधून आपल्या घरी जात असल्याचे दिसत आहे. रेंज रोव्हर कारमध्ये अनेक अपग्रेडेड फिचर्स आहेत. असे असतानाही बंदुकीची गोळी काचेतून आत शिरली. समोर आलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्धीकी यांच्या छातीत आणि पोटात 2-3 गोळ्या लागल्या होत्या.

रेंज रोव्हर- बुलेट प्रूफ कार

लँड रोव्हर रेंज रोव्हर ही अनेक लक्झरी फीचर्स असलेली कार आहे. परफॉर्मन्ससोबत गाडीमध्ये खूप चांगले सुरक्षेचे फिचर्स आहेत. या कारला 360-डिग्री शील्ड ऑफ प्रोटेक्शन आहे. ही कार 7.62 मिमी हाय पॉवर रायफलच्या हल्ल्याला तोंड देण्यासही सक्षम आहे. गाडीखाली दोन DM51 हँडग्रेनेडचा एकाचवेळी स्फोट होऊनही ही कार पुढे जाऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबारात 9.9 एमएम पिस्तुलचा वापर करण्यात आला होता. हे पिस्तूलही पोलिसांनी जप्त केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांचे पिस्तूल इतके अत्याधुनिक असावे की त्याच्या बुलेटने बुलेट प्रूफ कारच्या काचेलाही छेद दिला.