sharad pawar

शरद पवार आजही शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्रीच?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्याला पाच वर्षांसाठी सुटीवर पाठवलं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवारांना आजही शेतकरी शेतीशी संबंधित गोष्टींवर निवेदनं देत असतात.

Jul 20, 2014, 12:23 PM IST

पवार साहेब काय करताय हे बारामतीत?

जुलै संपत आला... अजूनही बारामती परिसरात पावसाची हजेरी नाही. दुष्काळाचं सावट आहे. पण याची जाण बारामतीतल्या जाणत्या राजांना आहे का? असा खरा प्रश्न आहे. माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या उदघाटन सोहळ्यात लाखो रूपयांची अक्षरशः उधळपट्टी करण्यात येत आहे. शेतकरी पाण्यासाठी दाही दिशा फिरतोय इथं मात्र जेवणावळी रंगतायत.

Jul 15, 2014, 09:07 PM IST

पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात पवारांनी फेसबुकवर माहिती दिलीय. लांबलेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

Jul 1, 2014, 01:05 PM IST

महादेव जानकर म्हणाले, 'पवार साहेब, नो उल्लू बनाविंग'

 शरद पवारांनी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला उल्लू बनवू नये, असं आवाहन रासप नेते महादेव जानकर यांनी केलं आहे

Jun 29, 2014, 10:08 PM IST

'काका पुतण्यांपेक्षाही मुख्यमंत्री कर्तबगार'

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराज भोसले यांनी आपल्याच पक्षाच्या अध्यक्षांना घरचा आहेक दिला आहे.

Jun 25, 2014, 04:29 PM IST

रोखठोक : लवासा का हवासा?

लवासा का हवासा?

Jun 25, 2014, 08:05 AM IST

राज्यातील 26 ठिकाणांचं 'लवासा'करण शक्य- शरद पवार

सह्याद्रींच्या रांगांना आता जाणत्या राजाचा आधार मिळालाय. महाराष्ट्राच्या या नैसर्गिक वारश्याचं 'लवासाकरण' करण्याची शरद पवारांची इच्छा आहे. महाराष्ट्रात 26 ठिकाणी लवासा सारख्या लेक सिटी उभारण्याची या महान नेत्यांची कळकळ विरोधकांना का बरे कळत नाही?

Jun 24, 2014, 02:54 PM IST

बीड पोटनिवडणुकीत मुंडेविरोधात उमेदवार नाही - पवार

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

Jun 21, 2014, 10:54 PM IST

राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात पुढील आठवड्यात फेरबदल - शरद पवार

राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात पुढच्या आठवड्यात फेरबदल होणार आहेत. एवढंच नव्हे तर संघटना पातळीवरही बदल केले जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच दिलीय.

Jun 20, 2014, 06:38 PM IST

मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये आरक्षणावर चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात काल सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली.

Jun 17, 2014, 12:03 PM IST