pruthviraj chavan

पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

पृथ्वीराज चव्हाण लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Sep 26, 2014, 06:37 PM IST

'दक्षिण कराड'मधूनच लढणार : मुख्यमंत्री

विधानसभा आपण दक्षिण कराडमधून लढणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. विलासकाका उंडारकर हे काँग्रेस आमदार अनेक वर्षांपासून दक्षिण कराडमधून निवडून येतात, मात्र यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना हा मतदारसंघ दिल्यास आपण बंडाचे निशाण फडकवू असा इशारा विलासकाका उंडारकर यांनी दिल्याने, मुख्यमंत्र्यांसमोर एक पेच निर्माण झाला आहे,

Sep 17, 2014, 02:45 PM IST

गावधन्याला घरात हक्काची वसरी मिळेना

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे मिस्टर क्लीन म्हणून त्यांच्या कारभारामुळे ओळखले जातात. ज्यांना एका सर्वेतून लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात जास्त पसंती दिली आहे. जे राष्ट्रवादी सारख्या बलाढ्य समजल्या जाणाऱ्या नेत्यांना नडले, पुरून उरले असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र विधानसभेसाठी हक्काचा मतदारसंघ मिळेनासा झाला आहे.

Sep 15, 2014, 11:36 AM IST

मुख्यमंत्री दक्षिण कराड मधूनच निवडणूक लढतील?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार, याबाबत चर्चा रंगली असताना त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी मुख्यमंत्री दक्षिण कराड मधूनच लढतील असे संकेत दिलेत. 

Sep 14, 2014, 08:51 PM IST

'100 दिवसात 100 रूपयेही परत आणले नाहीत'

राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. काळा पैसा भारतात आणणार, अशा वल्गना करणाऱ्या सध्याच्या केंद्र सरकारने 100 दिवसात 100 रूपयेही परत आणले नाहीत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. 

Sep 7, 2014, 06:13 PM IST

'नरेंद्र' मोदी म्हणजे 'मौनेंद्र' - पृथ्वीराज चव्हाण

निवडणुकीआधी बोलणारे नरेंद्र मोदी आता शांत का झाले आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मौनेंद्र मोदी झाले आहेत, अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्यांदाच टीकेची तोफ डागली आहे.

Jul 29, 2014, 08:54 PM IST

मुख्यमंत्री आणि राणेंची आज भेट होण्याची शक्यता

मुख्यमंत्री आणि काँग्रेस हायकमांडकडून राणेंचं मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे यांची भेट होण्याची शक्यता आहे.

Jul 22, 2014, 09:51 AM IST

मुख्यमंत्र्यांकडून 'फाम' घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

फाम हौसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अखेर चौकशीचे आदेश दिलेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी चौकशीचे आदेश दिले असून झी मिडियानं हा घोटाळा उघडकीस आणला होता. 

Jul 20, 2014, 03:31 PM IST

मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये आरक्षणावर चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात काल सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली.

Jun 17, 2014, 12:03 PM IST

राज्यात टाटा समूहाची हजारो कोटींची गुंतवणूक

महाराष्ट्रातून नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन गेलेल्या टाटा उद्योग समूहाने पुन्हा महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात टाटा समूह पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. यासाठी संपूर्ण आराखडा तयार करावा लागेल.

May 7, 2014, 10:45 AM IST