पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

पृथ्वीराज चव्हाण लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Updated: Sep 26, 2014, 10:43 PM IST
पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा title=

मुंबई : पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे.

काँग्रेसचा मित्र पक्ष राष्ट्रवादीने आघाडीतून काल बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तसेच काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला होता.

यानंतर आज पृथ्वीराज चव्हाण यांना राजीनामा देणे भाग होते. यानुसार आज पृथ्वीराज चव्हाण आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला.

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी भाजपने केली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.