गावधन्याला घरात हक्काची वसरी मिळेना

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे मिस्टर क्लीन म्हणून त्यांच्या कारभारामुळे ओळखले जातात. ज्यांना एका सर्वेतून लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात जास्त पसंती दिली आहे. जे राष्ट्रवादी सारख्या बलाढ्य समजल्या जाणाऱ्या नेत्यांना नडले, पुरून उरले असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र विधानसभेसाठी हक्काचा मतदारसंघ मिळेनासा झाला आहे.

Updated: Sep 15, 2014, 11:37 AM IST
गावधन्याला घरात हक्काची वसरी मिळेना title=

सातारा/कराड : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे मिस्टर क्लीन म्हणून त्यांच्या कारभारामुळे ओळखले जातात. ज्यांना एका सर्वेतून लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात जास्त पसंती दिली आहे. जे राष्ट्रवादी सारख्या बलाढ्य समजल्या जाणाऱ्या नेत्यांना नडले, पुरून उरले असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र विधानसभेसाठी हक्काचा मतदारसंघ मिळेनासा झाला आहे.

मुख्यमंत्र्यांचे वडिल आणि आई ज्या मतदारसंघातून निवडून येत, ज्या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करत, त्या कराडमधून पृथ्वीराज चव्हाण उमेदवारी करण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र दक्षिण कराडचं गणित जरा वेगळंच दिसतंय. 

दक्षिण कराडमधून विलास पाटील उंडाळकर काँग्रेसचं मागील २५-३० वर्षापासून प्रतिनिधीत्व करतात. विलासकाका उंडाळकर यांनी आपल्याला काँग्रेसने तिकीट दिलं नाही, तर आपण बंडाचा झेंडा फडकवू उभारू असं म्हटलंय, तर कराडच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आपण विलासकाका उंडाळकर यांच्यामागे उभे ठाकणार असल्याचं म्हटल्याने मुख्यमंत्र्यांसमोर आता खऱ्या अर्थाने पेच निर्माण झाला आहे.

जर काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी दक्षिण कराडमधून दिली, आणि विलासकाका राजी झाले नाहीत, तर पृथ्वीराज चव्हाण यांनाही आता विलासकाका उंडाळकर यांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.