poison

दिल्ली गँगरेप : आरोपीला मारहाण आणि विषप्रयोग!

दिल्ली गँगरेप प्रकरणातील एका आरोपी विनय शर्मा याला तुरुंगातील इतर कैद्यांनी मारहाण केलीय तसंच त्याच्यावर गेल्या महिनाभरापासून विषप्रयोगही होतोय, असा दावा त्याच्या वकिलांनी केलाय.

May 16, 2013, 08:42 AM IST

आंबा की विष ?

गोड आंबा का बनलाय विषारी ? रसाळ आंब्यावर कुणाची पडलीय वक्रदृष्टी ? आंब्यामुळे का मिळतंय गंभीर आजारांना निमंत्रण ? बाजारात आला फळांचा राजा! सर्वत्र होतेय आंब्याची विक्री !

Apr 17, 2013, 11:23 PM IST

सुगंधी दूध की विष?

मुंबई महापालिकेचं सुंगधी दूध पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यांत सापडलयं. मालवणी महापालिका शाळेत ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं सुंगधी दूध बंद करण्यात आलंय. यापूर्वीही काही शाळांमध्ये असा विषबाधेचा प्रकार घडला होता. पालिका शिक्षक सभेनं या सर्व प्रकाराची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केलीये.

Oct 13, 2012, 05:59 PM IST

लतादीदींवर झाला होता विषप्रयोग!

तब्बल सहा दशके ५० हजारांहून अधिक गाणी आपल्या जादुई स्वरात गाऊन जागतिक विक्रम करणार्या् गानसम्राज्ञी लतादीदी यांच्यावर पन्नास वर्षांपूर्वी ‘विषप्रयोग’ झाला होता. त्याचा खळबळजनक गौप्यस्फोट प्रख्यात डोगरा कवयित्री पद्मा सचदेव यांच्या ‘ऐसा कहां से लाऊ’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात गानसरस्वती लता मंगेशकर यांच्याबद्दल एक खळबळजनक घटना लिहिली आहे आणि ही घटना खुद्द लतादीदींनीच आपल्याला सांगितल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

Sep 29, 2012, 04:04 PM IST

तालिबानमध्ये मुलींना विष देऊन मारले

तालिबाननं आत्तापर्यंत एक हजार शाळकरी मुलींना विष देऊन मारल्याचं सांगण्यात येतंय. तर अनैतिक संबंधाचा आरोप ठेवून एका महिलेला क्रूरपणे मारलंय. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा हिंसाचार पुन्हा एकदा जगासमोर आलाय.

Jul 9, 2012, 11:08 PM IST

कुटुंबाला डाकिण ठरवून विष पाजलं

नंदूरबार जिल्ह्यात एका कुटुंबाला गावक-यांनी डाकिण ठरवलं. गावात झालेल्या तीन मृत्यूसाठीही वसावे कुटुंबाला जबाबदार ठरवत त्यांच्या मुलावर विष प्रयोग करण्याचा धक्कादायक प्रकारही करण्यात आला. मागील सहा महिन्यांपासून वेरी गावातल्या वेसावे कुटुंबाला डाकिण ठरवून अत्याचार सुरू आहेत.

May 12, 2012, 04:40 PM IST

वांद्र्यात ४५ जणांना लग्नाचे जेवण बाधले

मुंबईतील वांद्रे येथील भारतनगर वसाहतीतील ४५ जणांना रविवारी लग्नाचे जेवण बाधल्याने त्यांना पालिकेच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. या सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत वाडेकर यांनी सांगितले.

Apr 30, 2012, 09:13 AM IST

रंगाची बाधा : मुंबई पालिकेचा हलगर्जीपणा

मुंबईत झालेल्या रंगांच्या बाधेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कारखान्याच्या बाहेरुन हे विषारी रंग मुलांनी उचलले, तो नवरंग कंपाऊंडमधला रंग बनवण्याचा अवैध कारखाना मुंबई महापालिकेनं नोव्हेंबर २०११ मध्ये तोडला होता. मात्र त्यातले रंग तिथेच पडून होते. ते रंग उचलण्याची कारवाई कुणीही केली नाही. आणि हाच रंग मुलांनी उचलला आणि होळीचा बेरंग झाला.

Mar 9, 2012, 06:49 PM IST