हेमंत बिर्जे, www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिकेचं सुंगधी दूध पुन्हा एकदा वादाच्या भोव-यांत सापडलयं. मालवणी महापालिका शाळेत ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं सुंगधी दूध बंद करण्यात आलंय. यापूर्वीही काही शाळांमध्ये असा विषबाधेचा प्रकार घडला होता. पालिका शिक्षक सभेनं या सर्व प्रकाराची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केलीये.
मुंबई महापालिकेच्या मालवणी शाळेतील ११ विद्यार्थ्यांना सुंगधी दूधामुळं विषबाधा झालीयं. या विघार्थ्यांना उलट्या होत असल्यामुळे भगवती रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. याअगोदर शिवडी पालिकेच्या शाळेत सुंगधी दूधानं विषबाधा झाली होती. त्यामुळं पालिका प्रशासनानं दूध बंद केल होतं. पालिकेनं २००९ मध्ये सुगंधी दूध सुरू केल्यानंतर महापालिकेच्या ताडदेव शाळेत २०१० मध्ये विक्रोळी, मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये, २०११ मध्ये घाटकोपर शाळेत तर २०१२ मध्ये सप्टेंबर महिन्यात सुगंधी दूध सुरू केल्यानंतर विषबाधेची ही दुसरी घटना घडलीयं. सत्ततच्या विषबाधेमुळे पालिकेचं शिक्षणविभाग वादाच्या भोव-यात सापडलयं. या सुंगधी दूधाच्या कंत्राटाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी पालिका शिक्षक सभेनं केलीय़ं.
सीआयडी चौकशीबद्दल महापौरांनी सावध प्रतिक्रिया दिलीये. साधकबाधक चर्चेनंतरच सुंगधी दूध बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन महापौरांनी दिलयं.
सततच्या विषबाधेमुळे सुगंधी दूध वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रवृतीची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.