petrol price hike

भारत बंद : नुकसान केल्यास दंड

एनडीएने पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ उद्या ३१ मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे., या बंद दरम्यान काही नुकसान झाल्यास बंदकर्त्या संघटना आणि राजकीय पक्षांकडून दंडाच्या रूपाने होणाऱ्या नुकसानीची वसुली केली जाणार आहे.

May 30, 2012, 02:59 PM IST

उद्या 'भारत बंद', पेट्रोल दरवाढीचा निषेध

पेट्रोल दरवाढीचा भडका देशभर उडाला आहे. उद्या NDAनं भारत बंदची हाक दिली आहे. तर CNGच्या मुद्यावर दिल्लीत रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमती घटल्यानं पेट्रोल १.६७ पैशांनी कमी होण्याचे संकेत HPCL नं दिले.

May 30, 2012, 01:48 PM IST

ममता, हवं तर पाठिंबा काढा - काँग्रेस

केंद्रातील युपीए सरकारला नेहमीच कोंडीत पकडणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्‍या नेत्‍या ममता बॅनर्जी यांना पेट्रोलदरवाढीवरून हव तर पाठिंबा काढा, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर मागे घेण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात येण्याचे स्पष्ट झाले आहे.

May 26, 2012, 08:28 PM IST

दिल्लीत पेट्रोल होणार स्वस्त, महाराष्ट्राचं काय?

उत्तराखंड, केरळपाठोपाठ आता दिल्लीतही पेट्रोल स्वस्त होणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी पेट्रोलच्या करात कपात करण्याचे संकेत दिलेत. इतर राज्यांना जे जमतं ते महाराष्ट्राला का नाही, असा प्रश्न आता विचारला जातोय.

May 25, 2012, 04:45 PM IST

मंत्र्यांची इंधनावर उधळपट्टी

केंद्रीय कॅबिनेट मंत्री तसंच राज्य मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षात पेट्रोल आणि डिझेलवर तब्बल 3 कोटी 67 लाख रूपये उधळले आहेत.पेट्रोल दरवाढीचा भडका उडालाय. मात्र दुस-या बाजुला जनतेचे सेवक म्हणवणारे लोकप्रतिनिधी मात्र पेट्रोल, डिझेलवर करोडो रूपये उधळत आहेत.

May 25, 2012, 12:28 PM IST

पेट्रोलची दरवाढ का झाली?

पेट्रोलची दरवाढ करण्याची वेळ का आली, हा खरा प्रश्न आहे. गेल्या 2 आठवड्यात डॉलरची किंमत 3 रुपयांनी महागल्याने तेल कंपन्यांच्या तोट्यात सातत्यानं वाढ होत होती.

May 24, 2012, 11:25 PM IST

'युपीए'वर नाराज, तरी पाठिंबा तसाच

पेट्रोल भाववाढीच्या तापलेल्या तव्यावर अनेक पक्ष आपली पोळी भाजून घेण्यासाठी तयार झालेत. त्यातच युपीएकडं तुटपूंजे संख्याबळ आहे. त्यामुळं युपीएच्या घटक पक्षांची वाढती नाराजी पाहता पुढील काळ सरकारची सत्वपरीक्षा घेणारा असू शकतो.

May 24, 2012, 08:58 AM IST

पुन्हा पेट्रोल, डिझेल, गॅस होणार महाग?

सामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ सोसावी लागण्याची चिन्ह आहेत. ऑईल कंपन्यांच्या तोट्यात सातत्यानं वाढ होत असल्यानं पेट्रोल दरवाढीचं संकट अधिकच गडद झालंय.

May 23, 2012, 12:56 PM IST

"क्या हुवा तेरा वादा..."- पुणेकर

पेट्रोलवरची जकात दोन टक्क्यांवरून एक टक्का करण्याचं आश्वासन पुण्यातल्या राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र निवडणूक झाल्यावर राजकीय पक्षांना या आश्वासनाचा विसर पडलाय.

Apr 24, 2012, 11:16 PM IST

पेट्रोल दरवाढ तूर्त टळली

पेट्रोलची शनिवारी होणारी दरवाढ टळल्यामुळे ग्राहकांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे.

Apr 1, 2012, 02:14 PM IST

गोव्याइतकेच महाराष्ट्रात हवे पेट्रोल दर- सेना

गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातही पेट्रोलचे दर कमी करावेत अशी मागणी शिवसेना आमदार रामदास कदम यांनी केली आहे. नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये गोवा सरकारनं पेट्रोलवरचा व्हॅट कमी केला आहे. त्यामुळं गोव्यात पेट्रोलचे दर ११ रुपयांनी कमी झाले आहेत.

Mar 27, 2012, 05:58 PM IST

गोव्यात पेट्रोल ११ रुपयांनी स्वस्त

३१ मार्चपासून पेट्रलचे भाव ५ रुपयांनी वाढणार असल्याची चर्चा चालू असतानाच गोवा सरकारने मात्र २ एप्रिलपासून पेट्रोलचे भाव ११ रुपये प्रति लीटरने स्वस्त केला आहे आहे.

Mar 27, 2012, 04:20 PM IST

पेट्रोल पाच रूपयांनी महागण्याची शक्यता

निवडणुका संपताच आता महागाईचे चटके बसण्याची चिन्हं आहेत. पेट्रोलमध्ये पाच रुपये वाढ करण्याची मागणी पेट्रोल कंपन्यांनी केली आहे. पेट्रोलमध्ये दरवाढ केली जावी यासाठी सातत्याने पेट्रोल कंपन्या मागण्या करीत आहेत.

Mar 6, 2012, 07:25 PM IST

पेट्रोलच्या किंमतीत दीड रुपयांनी वाढ ?

आता परत एकदा पेट्रोलच्या प्रति लिटर १.५० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने त्याचा परिणाम आयातीच्या किंमतीवर झाला आहे.

Dec 31, 2011, 12:29 PM IST

अंकल सॅमच्या देशात पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त

भारतात पेट्रोलवरील कर जास्त असल्याने, देशात पेट्रोल शेजारील देश आणि अमेरिकेपेक्षाही महाग आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे राज्यमंत्री आर.पी.एन.सिंग यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ६६.४२ पैसे इतकी आहे तर अमेरिकेत पेट्रोल प्रति लिटरसाठी ४४.८८ पैसे मोजावे लागतात.

Nov 29, 2011, 02:46 PM IST