उद्या 'भारत बंद', पेट्रोल दरवाढीचा निषेध

पेट्रोल दरवाढीचा भडका देशभर उडाला आहे. उद्या NDAनं भारत बंदची हाक दिली आहे. तर CNGच्या मुद्यावर दिल्लीत रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमती घटल्यानं पेट्रोल १.६७ पैशांनी कमी होण्याचे संकेत HPCL नं दिले.

Updated: May 30, 2012, 01:48 PM IST

 www.24taas.com, नवी दिल्ली

पेट्रोल दरवाढीचा भडका देशभर उडाला आहे. उद्या NDAनं भारत बंदची हाक दिली आहे. तर CNGच्या मुद्यावर दिल्लीत रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमती घटल्यानं पेट्रोल १.६७ पैशांनी कमी होण्याचे संकेत HPCL नं दिले.

मात्र त्यासाठी आणखी दोन दिवस वाट पहावी लागेल. १ जूनला पेट्रोल कंपन्यांच्या बैठकीनंतरच यासंदर्भातील निर्णय घोषित होण्याची शक्यता आहे. पेट्रोल दरवाढीला विरोधकांमधूनच नाही तर यूपीएमधूनही विरोध होतांना दिसतो आहे.

पेट्रोल दरवाढ म्हणजे जनतेवर अन्याय असल्याची भूमिका ए.के एन्टोनी यांनी घेतली आहे. तर पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी सबसिडीचं समर्थन केलं आहे. यूपीएमध्ये वादाची स्थिती असतानाच आता याच मुद्यावर ममता बॅनर्जींपाठोपाठ डीएमकेदेखील रस्त्यावर उतरण्याच्या पवित्र्यात आहे.