पेट्रोलच्या किंमतीत दीड रुपयांनी वाढ ?

आता परत एकदा पेट्रोलच्या प्रति लिटर १.५० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने त्याचा परिणाम आयातीच्या किंमतीवर झाला आहे.

Updated: Dec 31, 2011, 12:29 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

आता परत एकदा पेट्रोलच्या प्रति लिटर १.५० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने त्याचा परिणाम आयातीच्या किंमतीवर झाला आहे. तेल कंपन्यांनी १५ डिसेंबर रोजी घेतलेल्या आढाव्यात ग्राहकांवर प्रति लिटर ६५ ते ७० पैशांचा बोजा न टाकण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळेस रिझर्व्ह बँक रुपयांची घसरण रोखू शकले अशी आशा त्यांना वाटली होती.

 

आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसोलीनच्या किंमती मागील वेळेच्या आढाव्या एवढ्याच राहिल्या असल्या तरी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया प्रति डॉलर ५३ रुपयांच्या वर गेला आहे. विनिमय दर डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात डॉलरला ५१.९८ रुपये इतका होता, आता त्यात आणखीन घसरण झाली हे. इंडियन ऑईल सारख्या सरकारी तेल कंपन्या किरकोळ किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील पंधरवड्याच्या किंमती आणि विनिमय दराच्या आधारे निश्चित करतात.

 

सध्या तेल कंपन्या प्रति लिटर ८५ पैशांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकल सेल्स टॅक्ससह पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर १.०२ रुपयांनी रुपयांनी वाढ होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घट झाल्याने सरकारी  तेल कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यात दोन वेळ पेट्रोलच्या दरात कपात केली होती. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात १६ डिसेंबरला प्रति लिटर २.२२ रुपये तर १ डिसेंबरला ०.७८ पैशांनी कपात केली होती. पेट्रोलच्या किंमती जून महिन्यात नियंत्रण मुक्त केल्या असल्या तरी सरकारी तेल कंपन्या तेल मंत्रालयाचा सल्ला दरवाढ करता घेतात. सरकार अजूनही डिझेल, केरोसीन आणि एलपीजीच्या किंमतीवर नियंत्रण ठेवते.