www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रातील युपीए सरकारला नेहमीच कोंडीत पकडणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना पेट्रोलदरवाढीवरून हवं तर पाठिंबा काढा, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर मागे घेण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात येण्याचे स्पष्ट झाले आहे.
ममता बॅनर्जी यांचा पेट्रोलच्या दरवाढीवर आक्षेप आहे. खुशालपणे सरकारला पाठिंबा काढून घ्यावा, अशा शब्दांमध्ये कॉंग्रेसने ममतांना उत्तर दिले आहे. पेट्रोल दरवाढीविरोधात ममता बॅनर्जी कोलकातामध्ये रॅली काढली. रिटेलमध्ये एफडीआयच्या मुद्यावरुन ममता बॅनर्जी यांनी रणकंदन केले होते. ममतांच्या थयथयाटानंतर काँग्रेसला नमते घ्यावे लागले होते. त्यामुळे ममतांच्या इशाऱ्यानंतर केंद्रातील सरकरारला एक पाऊल मागे यावे लागेल अशी शक्यता होती. मात्र, केंद्राने एक पाऊल पुढे टाकले.
काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यंदा पेट्रोल दरवाढीचा निर्णय कॉंग्रेसने परस्पर घेतला. त्यामुळे ममतांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता कॉंग्रेसने ममतांचा हट्ट सहन न करण्याचा पावित्रा घेतला आहे. काँग्रेसचे खासदार अधीर चौधरी यांनी ममतांना पाठींबा काढून घेण्याचे आव्हान दिले आहे. पेट्रोल दरवाढीचा निर्णय सरकारने परस्पर घेतला. कॉंग्रेसचा हा निर्णय मोठा धाडसी होता. युपीएतील घटकपक्षांनाही यासंदर्भात विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे तृणमूल आणि डीएमके या पक्षांनीही विरोध केला आहे. मात्र, काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असल्याने ममता दिदीनाच इशारा देत हवाच काढून घेतली आहे.