nasik

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या आजाराचे थैमान

सात महिन्यात स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत ६५ रुग्णांचा मृत्यू आणि तोही केवळ नाशिक जिल्ह्यात. शहरात यापैकी ५० मृत्यू झाले. 

Sep 7, 2017, 08:08 PM IST

गणेश विसर्जनासाठी भक्तांचा पूर

 गणेश विसर्जनासाठी गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहचलाय. ठिकठिकाणी गणपती विसर्जन मिरवणूक थाटात सुरू दिसतेय. 

Sep 5, 2017, 05:22 PM IST

'बकरी ईद' आधी नाशिकच्या बकऱ्या अरब देशात रवाना

बकरी ईद या मुस्लिम धर्मियांच्या सणासाठी अरब राष्ट्रात चक्क ३२ कार्गो विमानं भरून बोकड आणि बकऱ्या नाशिकमधून रवाना झाल्या आहेत. त्यामुळे नाशिक आता जगभरातील महत्त्वाचं पाळीव प्राणी निर्यात केंद्र बनलंय. 

Sep 1, 2017, 11:15 PM IST

नाशिककरांनो सावधान! तुम्ही अनधिकृत इमारतीत राहता?

महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केलेल्या सर्वेक्षणात शहरातील तब्बल ५६ हजार मिळकतींची मनपाच्या दप्तरी नोंदच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय. त्यामुळे नाशिकच्या इमारतींची अधिकृत की अनधिकृत अशी नोंदणीच नसल्याचं उघड झालंय.

Sep 1, 2017, 12:00 AM IST

नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या मुलींचं चक्काजाम आंदोलन

 शेतक-यांना सरसकट कर्जमाफीसाठी तसंच मुला-मुलींना विविध शैक्षणिक सवलती, शैक्षणिक कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी  नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर घारगाव इथं शेतक-यांच्या मुलींनी काही काळ चक्का जाम आंदोलन केलं आहे.

Aug 23, 2017, 02:13 PM IST

आरटीओ अधिकाऱ्यांचे लॉग इन आयडी - पासवर्ड हॅक!

आजवर सामान्य नागरिकांचे इमेल्स हॅक झाल्याची अनेक प्रकरणं ऐकिवात येत होती. मात्र, नाशिकमध्ये चक्क प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याचं संकेतस्थळ हॅक करण्यात आलंय. हे संकेतस्थळ हॅक करुन परस्पर परवाने दिल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

Aug 22, 2017, 12:32 PM IST

नाशिकमध्ये कुख्यात गुंडाचा अज्ञातांकडून खून, नागरिकांत दहशत

नाशिकच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कला नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय.

Aug 18, 2017, 01:31 PM IST

नाशिककरांवर मालमत्ता, पाणीपट्टी कराच्या वाढीचा बोजा

शहरवासीयांवर आता मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कराच्या वाढीचा बोजा पडलाय. मालमत्ता करात १८ टक्के तर पाणीपट्टीत तिपटीने वाढ करण्यात आली आहे. 

Aug 17, 2017, 08:31 PM IST

'राईट टू पी'ला नाशिक हॉटेल मालकांचा पाठिंबा

महिलांचे आरोग्य जपण्यासाठी नाशिकच्या हॉटेल व्यवसायिकांनी  पुढाकार घेतलाय. दिल्लीच्या धर्तीवर महापालिका हद्दीतील हॉटेल्समधील शौचालये महिलासाठी खुली केली जाणार आहेत. महिलांसाठी पुरेशा शौचालयांची उभारणी करण्यात महापालिका अपयशी ठरल्याने महिलांची कुचंबणा दूर करण्यासाठी हॉटेल असोसिएशन पुढे आलीय.

Aug 11, 2017, 09:47 PM IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ

नाशिक शहरात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढू लागलंय. सोशल मीडियाचा गैरवापर, लग्नाचे आमिष, आंधळा विश्वास अशी अनेक कारणे यातून समोर येत असून अत्याचार करणाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलांचे वाढणारे प्रमाण सामाजिक चिंता वाढविणारे आहे.

Aug 11, 2017, 05:41 PM IST