नाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या आजाराचे थैमान

सात महिन्यात स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत ६५ रुग्णांचा मृत्यू आणि तोही केवळ नाशिक जिल्ह्यात. शहरात यापैकी ५० मृत्यू झाले. 

Updated: Sep 7, 2017, 08:08 PM IST
नाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या आजाराचे थैमान   title=

योगेख खरे, झी मीडिया, नाशिक : सात महिन्यात स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत ६५ रुग्णांचा मृत्यू आणि तोही केवळ नाशिक जिल्ह्यात. शहरात यापैकी ५० मृत्यू झाले. 

नाशिक महापालिका हद्दीतील १८, सिव्हिलमध्ये ३० आणि जिल्ह्याबाहेरील आठ रुग्णांचा समावेश आहे. तर निफाड तालुक्यात पाच, सिन्नर, नाशिक तालुक्यात प्रत्येकी तीन, देवळा, चांदवड, मालेगाव महापालिका क्षेत्रात प्रत्येकी दोन तर दिंडोरी तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे दुर्गम समजल्या जाणाऱ्या आणि आरोग्य सुविधा न मिळणाऱ्या सात तालुक्यात या आजाराने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

आरोग्य विभागाने सात महिन्यात ऐंशी हजार रुग्णांची तपासणी केली. त्यात संशयित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात आले. टॅमीफ्लूचा उपचार सुरु असला तरी खाजगी रुग्णालयात हा उपचार अधिक खर्चिक ठरतो आहे. 

गर्दी असलेल्या भागात या रोगाचा प्रादुर्भाव अधिक तर कमी गर्दी असणाऱ्या भागात कमी असल्याचे दिसून येते. ही आकडेवारी समोर आल्यावर स्वाइन फ्लू आणि डेंग्यूबाबत प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत लोकांनी सजग होण्याचाही गरज आहे.