नाशिकच्या महापौरपदाचा आज निर्णय
नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक आज होत आहे. सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या मनसेनं सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपनंही मनसेला साथ देण्याचं ठरवलं आहे. मात्र शिवसेनेची भूमिका अजूनही स्पष्ट नाही.
Mar 15, 2012, 09:26 AM ISTराज'मार्ग' अवघडच....
मुंबई महापालिका निवडणूकीत किंग बनण्याचं स्वप्न मनी बाळगेल्या राज ठाकरेंची निकालानंतर निराशाच झाली. मुंबईतल्या असमाधानकारक कामगिरीसाठी काही प्रमाणात स्वतः राज ठाकरे यांना तर ब-याच प्रमाणात पक्षसंघटनेला जबाबदार मानलं जातंय. मुंबई महापालिका निवडणूकीचे निकाल पाहाता 2014 साली होणा-या विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीनं मनसेला कामगिरी सुधारण्यासाठी बराच वेळ हाती आहे.
Feb 29, 2012, 04:31 PM ISTसर्वपक्षीय संमतीनेच रिपाइंचा महापौर शक्य- आठवले
काँग्रेसच्या भूमिकेमुळे नाशिकमध्ये आरपीआयचा महापौर करुन सत्तास्थापनेचा राष्ट्रवादीचा फॉर्म्युला बारगळल्याची चिन्हं दिसत आहेत. छगन भुजबळ यांनी आठवलेंना आरपीआयचा महापौर करण्याची ऑफर दिली होती. भुजबळांनी त्यासाठी सेना, भाजपची मदत मिळवून द्या, असं आठवलेंना सांगितलं होतं
Feb 27, 2012, 09:11 PM IST