'त्याने 1.5 अब्ज भारतीयांचा अपमान केलाय!' ट्रेव्हिस हेडच्या 'त्या' इशाऱ्यांवर भडकले नवज्योत सिद्धू , केली कारवाईची मागणी

IND VS AUS Test : मेलबर्न टेस्टच्या शेवटच्या दिवशी भारताची विकेट पडल्यावर ट्रेव्हिस हेडने केलेल्या एका इशाऱ्यावरून सध्या वाद सुरु आहे. त्यावर आता माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धूने देखील टीका केली आहे. 

पुजा पवार | Updated: Dec 31, 2024, 02:07 PM IST
'त्याने 1.5 अब्ज भारतीयांचा अपमान केलाय!' ट्रेव्हिस हेडच्या 'त्या' इशाऱ्यांवर भडकले नवज्योत सिद्धू , केली कारवाईची मागणी title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात सध्या 5 सामान्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवली जात असून यातील चौथा सामना मेलबर्न येथे पार पडला. 30 डिसेंबर रोजी या सामन्याचा शेवटचा दिवस होता आणि ऑस्ट्रेलियाने भारतावर 184 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर टीम इंडिया सीरिजमध्ये 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे सीरिज बरोबरीत सोडवायची असल्यास टीम इंडियाला (Team India) टेस्ट सीरिजमधील शेवटचा सिडनी येथे होणारा सामना जिंकावा लागेल. मेलबर्न टेस्टच्या शेवटच्या दिवशी भारताची विकेट पडल्यावर ट्रेव्हिस हेडने केलेल्या एका इशाऱ्यावरून सध्या वाद सुरु आहे. त्यावर आता माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धूने देखील टीका केली आहे. 

ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर ट्रेव्हिस हेड भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ऋषभ पंतची विकेट घेतल्यावर एक वेगळ्याच प्रकारचं सेलिब्रेशन केले. पंत उत्कृष्ट फलंदाजी करत होता आणि जयस्वाल सह मैदानात जम बसण्याचा प्रयत्न देखील करत होता, मात्र सिक्स मारण्याच्या प्रयत्नात मिचेल मार्शने बाउंड्रीवर पंतचा कॅच पकडला. ऑस्ट्रेलियाचा पार्टटाइम स्पिनर ट्रेव्हिस हेडच्या बॉलिंगवर पंत आउट झाला होता ज्यामुळे विकेट मिळाल्यावर हेडने मैदानात हातांचे इशारे करून विचित्र सेलिब्रेशन केले. हेडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याची जोरदार चर्चा होऊ लागली. भारताचा माजी क्रिकेटर  नवजोत सिंह सिद्धूने हेड विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. 

नवजोत सिंह सिद्धू भडकले : 

नवजोत सिंह सिद्धूने सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रेव्हिस हेडच्या या वादग्रस्त इशाऱ्यावर प्रतिक्रिया देत लिहिले की, "मेलबर्न टेस्ट दरम्यान ट्रेव्हिस हेडने केलेली कृती क्रिकेट सारख्या जेंटलमन खेळासाठी चांगली नाही... हे सर्वात खराब उदाहरण आहे. जेव्हा लहान मुलं, महिला आणि युवा तसेच वृद्ध व्यक्ती हा खेळ पाहत असतील. या कृतीने कोणत्या व्यक्तीचे नाही तर 1.5 अब्ज भारतीयांची मन दुखावली आहेत. त्याला याकरता मोठी शिक्षा द्यायला हवी. जे भविष्यातील पिढ्यांसाठी एक प्रतिबंधक म्हणून काम करेल, जेणेकरून कोणीही असे करण्यास धजावणार नाही". 

हेही वाचा : 'कॅप्टन नसता तर प्लेईंग 11 मध्ये सुद्धा घेतलं नसतं', मेलबर्नमधील पराभवानंतर भडकला इरफान पठाण

पॅट कमिन्सने सांगितली हेडच्या इशाऱ्या मागची कहाणी : 

ट्रेव्हिस हेडने पंतच्या विकेटनंतर केलेल्या वादग्रस्त सेलिब्रेशनवर पत्रकारांनी कर्णधार पॅट कमिन्सला प्रश्न विचारला. यावर कमिन्सने सांगितले की, "हेडची बोटं एवढी गरम झाली होती की त्याच बोटं ही बर्फाने भरलेल्या ग्लासमध्ये टाकावी लागली. गाबा टेस्ट दरम्यान सुद्धा असेच घडले जेव्हा हेडला विकेट मिळाल्यावर तो फ्रिजकडे धावत गेला, बर्फाची बाटली घेतली आणि त्यात बोटं टाकली. बस इतकंच या अॅक्शनचा दुसरा काहीही अर्थ नाही"