सत्ता-संपत्ती-साधनांना हरवत शिवसेनेचा विजय : उद्धव ठाकरे
महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये टक्कर झाली. शिवसेनेने भाजपला विजयानंतरही टोकले आहे. सत्ता, संपत्ती, साधनांच्या जोरावर ताकद लावली गेली. मात्र, शिवसेनेला कोणीही रोखून शकत नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाणला.
Feb 23, 2017, 07:43 PM IST220 मध्ये चिठ्ठीने शिवसेनेला दिला दणका, भाजपात जल्लोष
पालिका निवडणुकीत सर्वात चुरशीची आणि उत्कंठा वाढविणारी लढत ठरली आहे वॉर्ड क्रमांक २२० ची. यात भाजपचे अतुल शहा आणि सुरेंद्र बागल यांना समसमान मते पडली. अखेर चिठ्ठी टाकण्यात आली. यात भाजपची सरसी झाली.
Feb 23, 2017, 06:58 PM ISTमुंबईत चिठ्ठी टाकून लागणार निर्णय.... पाहा कोणाचं लक फळफळणार
मुंबईच्या निवडणुकीत सर्वात चुरशीची आणि उत्कंठा वाढविणारी लढत ठरली आहे वॉर्ड क्रमांक २२० ची. यात भाजपचे अतुल शहा आणि सुरेंद्र बागल यांना समसमान मते पडली. त्यामुळे येथे फेरमोजणी झाली. यावेळीही समान मते असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चिठ्ठीवर भवितव्य ठरविण्यात येणार आहे.
Feb 23, 2017, 06:37 PM ISTशिवसेनेचे आजी-माजी 4 महापौर, नवे चेहरे मुंबई महानगरपालिकेत
पालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल लागेल आहे. शिवसेनेने प्रथम स्थान आबाधित राखताना भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे शिवसेनेला एकहाती सत्ता स्थापन करणे अवघड झाले आहे. शिवसेनेचे आजी-माजी 4 महापौर, नवे चेहरे मुंबई महानगरपालिकेत निवडणून गेलेत.
Feb 23, 2017, 05:48 PM ISTमुंबईत शिवसेना - भाजप उमेदवारांना समसमान मते, फेर मतमोजणी
मुंबई पालिका निवडणुकीत प्रभाग 220मध्ये 'टाय' झाली आहे. त्यामुळे या प्रभागाकडे लक्ष लागले आहे.
Feb 23, 2017, 02:10 PM ISTLIVE निकाल : इथे पाहा, जनतेनं कुणाला दिलाय कौल
राज्यातील 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज लागणार आहेत. थोड्याच वेळात जनतेनं या निकालात कुणाला कौल दिलाय, हे स्पष्ट होईल.
Feb 23, 2017, 09:00 AM ISTसोमय्या बिल्डर्सचे दलाल - खासदार राहुल शेवाळे
पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केलंय.
Feb 13, 2017, 10:27 PM ISTमुंबईत भाजपची नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी
भाजपनं मुंबईत भाजपनं 72 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
Feb 2, 2017, 02:31 PM ISTमुंबई महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम ही मैदानात
महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रावादी आणि मनसे पाठोपाठ आता एमआयएम ही निवडणुक आखाड्यात उतरली आहे.
Jan 29, 2017, 10:59 AM ISTयुती तुटल्यानंतर भाजप आणि मित्रपक्षांची बैठक
महानगरपालिका जागावाटपा संदर्भात भाजप आणि मित्रपक्षांची मुंबईतल्या रंगशारदामध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. बैठकीला भाजप मुंबई अध्यक्ष अशिष शेलार, आरपीआय कडून अविनाश महातेकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, तर रासपचे महादेव जानकर यांच्यावतीनं रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.
Jan 28, 2017, 09:04 AM ISTशिवसेनेचा वचननामा : मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस
शिवसेना भाजप युतीचं चर्चेचं गाडं अडलं असतानाच शिवसेनेनं सोमवारी स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध केला. या वचननाम्यात मुंबईकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. पण गर्जेल तो खरंच पडेल काय? हा पाहावं लागणार आहे.
Jan 23, 2017, 06:45 PM ISTशिवसेनेची निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मोर्चेबांधणी सुरू
शिवसेना-भाजप युतीचा तिढा अजून सुटला नसताना निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आणखी एक अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवार नगरसेवक प्रविण शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Jan 16, 2017, 08:34 AM ISTशिवसेना-भाजपमध्ये युती संदर्भात आज पहिली बैठक
आगामी महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती संदर्भात आज पहिली बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेनेकडून अनिल परब आणि अनिल देसाई उपस्थित राहणार आहे. तर भाजपाकडून आशिष शेलार, विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.
Jan 16, 2017, 08:24 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसवर उपरोधक टोला
मुंबई महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असल्यामुळेच त्यांनी उमेदवार निवड सुरू केली असा उपरोधक टोला राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर यांनी लगावला आहे.
Jan 15, 2017, 06:08 PM ISTमुंबई मनपा निवडणुकीत युती करून लढायला हवं - रामदास आठवले
मुंबई महानगर पालिका निवडणुकीत युती करून लढायला हवं असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. युती झाली तर आरपीआय २० ते २५ जागा मागेल आणि जर युती झाली नाही तर ४० ते ५० जागा आम्ही मागणार असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.
Jan 15, 2017, 05:13 PM IST