220 मध्ये चिठ्ठीने शिवसेनेला दिला दणका, भाजपात जल्लोष

पालिका निवडणुकीत सर्वात चुरशीची आणि उत्कंठा वाढविणारी लढत ठरली आहे वॉर्ड क्रमांक २२० ची. यात भाजपचे अतुल शहा आणि सुरेंद्र बागल यांना समसमान मते पडली. अखेर चिठ्ठी टाकण्यात आली. यात भाजपची सरसी झाली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 23, 2017, 06:58 PM IST
220 मध्ये चिठ्ठीने शिवसेनेला दिला दणका, भाजपात जल्लोष title=

 मुंबई : पालिका निवडणुकीत सर्वात चुरशीची आणि उत्कंठा वाढविणारी लढत ठरली आहे वॉर्ड क्रमांक २२० ची. यात भाजपचे अतुल शहा आणि सुरेंद्र बागल यांना समसमान मते पडली. अखेर चिठ्ठी टाकण्यात आली. यात भाजपची सरसी झाली.

मुंबईतील २२७ पैकी २२६ जागांचे जवळजवळ निकाल लागले असून अखेरचा वॉर्ड म्हणून २२७ राहिला असून दोघांनाही ५९४६ मते पडली आहेत. त्यामुळे आता चिठ्ठी टाकून उमेदवाराला घोषीत करण्यात आला. 

सध्या या वॉर्ड मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवसेना भाजपचे वरिष्ठ नेते या ठिकाणी पोहोचले होते.  महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासमोर चिठ्ठी टाकली गेली. त्यानंतर भाजपची चिठ्ठी उचली गेली आणि भाजपचा उमेदवार विजयी घोषित करण्यात आले.