मुंबईत भाजपची नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी

भाजपनं मुंबईत भाजपनं 72 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Updated: Feb 2, 2017, 02:33 PM IST
मुंबईत भाजपची नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी title=

मुंबई : भाजपनं मुंबईत भाजपनं 72 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण त्यात बहुदा पक्षाच्या परंपरेचा बहुदा विसर पडला आहे. मुंबई महापालिकेच्या निवणूकीत भाजपच्या तिकीटावर राज पुरोहिताचं पुत्र अवकाश पुरोहित, किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या, आशिष शेलारांचे भाऊ विनोद शेलार यांना तिकिट मिळालं आहे.

काही ठिकाणी इतर पक्षांचे उमेदवार बघून भाजप शेवटच्या क्षणी उमेदवार देणार आहे. थोडक्यात काही दिवसांपूर्वी आक्रमक असलेला भाजप आता उमेदवार अर्ज भरण्याच्या वेळी काहीसा बॅकफूट वर गेलेला आहे.