mns adhikrut

'वेळ आली की फणा काढतातच, पण मी बी पट्टीचा गारुडी आहे' वसंत मोरेंचा रोख कुणाकडे?

MNS in Loksabha Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती आखली जातेय. याची सुरुवात त्यांनी पुण्यापासू केलीय. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी पाद पदाधिकाऱ्यांची नावं निश्चित केली असून यातल्या एका नावाची घोषणा केली जाणार आहे. पण त्याआधीत मनसेत कुरबुर सुरु झाली आहे. 

Feb 7, 2024, 04:04 PM IST

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चा

Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

Dec 22, 2023, 02:13 PM IST

लोकसभेसाठी मनसे कामाला, टेन्शन कुणाला? 'या' 20 मतदार संघात उमेदवार देणार

लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलंय. त्यानुसार मनसेने लोकसभा निवडणुसाठी कंबर कसली आहे. राज्यात तब्बल 20 जागांवर मनसे उमेदवार देण्याची चर्चा असून त्यादृष्टीने तयारीसुद्धा सुरु केली आहे. 

Nov 21, 2023, 06:49 PM IST

जरांगेंच्या पाठीशी कोण? मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही, राज ठाकरेंचा दावा

Raj Thackeray : मनोज जरांगेंच्या पाठीशी कोण असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे , मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही असा दावाही राज ठाकरे यांनी केला आहे.  25 डिसेंबरला जरांगे सांताक्लॉज बनून येणार का असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. 

Nov 16, 2023, 02:00 PM IST

'भाजपने टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नवं खातं उघडलंय' मोफत अयोध्यावारीवरुन राज ठाकरेंचा टोला

Raj Thackeray : गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात भाजपाला निवडून दिलं तर रामलल्लाचं दर्शन फुकट करून दिलं जाईल अशी घोषणा केली. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. 

 

Nov 16, 2023, 01:40 PM IST

मिशन बारामती, राज ठाकरेंची रणनीती! चर्चा वसंत मोरेंची

लोकसभेसाठी मनसे कामाला लागलीय, विशेष म्हणजे पवारांच्या बालेकिल्ल्यावर राज ठाकरेंनी लक्ष केंद्रीत केलंय. वसंत मोरेंसारख्या मनसेतील लोकप्रिय नेत्यावर बारामतीची जबाबदारी येऊ शकते.. मात्र अचानक बारामती लोकसभा मतदारसंघात मनसे जोर का लावणार आहे, असा प्रश्न उपस्थित झालाय.

Oct 20, 2023, 10:57 PM IST

शासन 'राज ठाकरें'च्या दारी, 'मंत्र्याने घरी जाऊन चर्चा करण्याची राज्यात नवी पद्धत'

टोलच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले. टोल वसुलीत कशा पद्धतीनं अनियमतता आहे, काय बदल अपेक्षित आहेत याचा लेखाजोखा राज ठाकरेंनी मांडला आणि राज्य सरकारनं तातडीनं कार्यवाही सुरु केली. मात्र याच मुद्द्यावरुन शासन राज ठाकरेंच्या दारी म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केलाय. 

Oct 13, 2023, 07:29 PM IST

राज्यातले 44 टोलनाके बंद होणार? वाचा टोलसंदर्भातल्या 20 महत्त्वाच्या मागण्या

राज्यातील टोलच्या मुद्द्यावर राज्य सरकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बैठक झाली. याबैठकीत काही मुद्यांवर चर्चा करण्यात आली. आता टोलनाक्यांवर सरकार आणि मनसेच्या सीसीटीव्हीची नजर असणार आहे. तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे.

Oct 13, 2023, 02:03 PM IST

मोठी बातमी! MH O4 गाड्यांना मिळणार टोलमाफी? अशी आहे योजना

Raj Thackeray meet CM Eknath Shinde : MH 04 च्या गाड्यांना टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं आहे. 

Oct 12, 2023, 06:09 PM IST

मुंबईत मराठी माणसाला 50 टक्के घरं हवीच, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आरक्षणाची मागणी

मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य मराठी माणूस हे घर विकत घेऊ शकत नाही.यावर उपाय म्हणून पार्ले पंचम ह्या सामाजिक संस्थेचे श्रीधर खानोलकर यांनी 50 टक्के घरे मराठी माणसांसाठी आरक्षित करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे

Oct 12, 2023, 04:49 PM IST

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक, फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ दाखवून टोल न देताच वाहनांना सोडलं

टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम, असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मुलुंडचा आनंदनगर टोलनाका आणि ऐरोलीच्या टोलनाक्यावर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

Oct 9, 2023, 02:09 PM IST

शिवाजी पार्कात प्राण्यांचा संचार! आधी स्विमिंगपुलमध्ये मगर आता स्मारकात धामण

दादरमधल्या शिवाजी पार्क इथल्या जलतरण तलावात काही दिवसांपूर्वी मगर आढळली होती. यावरुन बरेच आरोप प्रत्यारोपही झाले. हे प्रकरण ताजं असतानाच आता शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात धामण जातीचा साप आढळून आलाय.

Oct 6, 2023, 08:19 PM IST

महाराष्ट्रात एअरटेलची गुजराती जाहीरात, मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक

एअरटेलच्या गुजराती जाहिरातीवर मनसेने आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या मुलुंड इथं मराठी महिलेला गुजराती रहिवासी इमारतीत ऑफिस नाकारल्याची घटना घडली होती. मनसेने दणका दिल्यानंतर इमारतीच्या सेक्रेटरीने माफी मागितली होती. 

Oct 3, 2023, 07:11 PM IST

'बंबई मेरी जान' वेब सिरीजच्या नावावरून मनसे आक्रमक' खळखट्याकचा इशारा

गुन्हेगारी जगताशी संबंधीत बंबई मेरी जान ही वेबसीरिज ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. मुंबईतील माफियाराजवर आधारीत ही वेबसीरिज आहे. पण प्रदर्शनापूर्वीच ही वेबसीरिज वादात सापडली आहे. मनसेने वेबसीरिजच्या नावावर इशारा दिला आहे.

Sep 14, 2023, 03:29 PM IST

मनसेचं एक पाऊल पुढे! लोकसभेसाठी खास रणनिती... 'या' नेत्यांवर सोपवली जबाबदारी

देशात वन नेशन वन इलेक्शनची जोरदार चर्चा सुरु आहे. मोदी सरकार विशेष अधिवेशन बोलवून विधेयक आणणार असल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान मनसेने थेट लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे, यासाठी त्यांनी खास रणनिती तयार केली आहे. 

Sep 6, 2023, 04:16 PM IST