malin

माळीण दुर्घटनेतील मृतांची आज सामूहिक दशक्रिया विधी

डोंगरकडा कोसळून उद्धवस्त झालेल्या माळीण गावातील दुर्घटनेत मृत पावलेल्यांची सामूहिक दशक्रिया विधी आज पार पडली. 30 जूलै रोजी घडलेल्या या दुर्घटनेत 43 घरं गाडली गेली होती. त्यात 151 ग्रामस्थांचा मृत्यू झाला.

Aug 10, 2014, 03:09 PM IST

माळीणमध्ये दरड हटवताना 'त्यांच्या' लग्नाचा सापडला बस्ता

एक अत्यंत हृदयद्रावक अशी बातमी. माळीण दुर्घटनेनंतर गेल्या सहा दिवसांपासून शोधकार्य सुरू आहे. तिथं ढिगा-याखालून आतापर्यंत 129 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. पण एनडीआरएफ जवानांच्या हाती जे साहित्य सापडलं, ते पाहून काळजाला चटका लागला.

Aug 5, 2014, 11:16 AM IST

माळीण दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळेच- भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभाग

माळीण गावातील दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळं झाली असल्याची माहिती भू-वैज्ञानिक सर्वेक्षणचे महासंचालक हर्भनसिंग यांनी दिलीय. तीव्र उतार, दमदार पाऊस आणि भू-रचनेमुळं ही घटना घडल्याचं त्यांनी म्हटलंय. भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचा प्राथमिक निष्कर्ष समोर आलाय. 

Aug 3, 2014, 08:18 PM IST

आनंदाची बातमी!, 3 महिन्याचा रूद्र आईसह बचावला

माळीण गावात झालेल्या दुर्घटनेत प्रत्येक घरात मनुष्य हानी झालीय. मात्र लिंबे कुटुंबियांच्या घरात आश्चर्यकारकरित्या सगळे बचावले. विशेष घरातल्या एका तीन महिन्यांच्या बाळाने अक्षरशः काळावर मात केलीय.

Jul 31, 2014, 07:47 PM IST

कुटुंबात रडायलाही कुणी राहिलेलं नाही

पासून 60 किलोमीटरवर असलेल्या मालीण गावावर डोंगराचा मोठा भाग कोसळलाय. डिंभे धरणाच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या आदिवासी महादेव कोळी समाजाचं हे माळीण गाव आहे. हा डोंगर त्यांना त्यांच्या घरादारातला वाटायचा.

Jul 31, 2014, 05:42 PM IST