mahad bridge collapse

महाड पूल दुर्घटना नैसर्गिक कारणामुळेच

महाड दुर्घटनेत मानवी चूक नसल्याचं आयआयटी मुंबईच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Sep 26, 2016, 09:21 PM IST

महाड सावित्री पूल दुर्घटनेतील दुसरी एसटी सापडली

रायगडमधील महाड सावित्री पूल दुर्घटनेतील दुसरी बस बाहेर काढण्यात यश. किनारायापासून काही अंतरावर जयगड - रत्नागिरी बस सापडली.

Aug 13, 2016, 09:32 PM IST

महाड दुर्घटनेतील एसटीचे अवशेष सापडले

घटना स्थळावरून २०० मीटरवर एसटीचे अवशेष सापडले

Aug 11, 2016, 11:28 AM IST

महाड दुर्घटनेनंतर शिवरायांनी बांधलेला हा पूल होतोय व्हायरल

महाडमध्ये पूल वाहून गेल्याच्या या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर या घटनेला जबाबदार कोण याच्या चर्चा सुरु झाल्या. अनेक पोस्ट प्रतिक्रियांच्या रुपात व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबूक सारख्या सोशल मीडियावर फिरु लागल्या. अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधल्या गेलेल्या पुलाची.

Aug 8, 2016, 09:30 AM IST

महाड पूल दुर्घटना : मगरींच्या दहशतीने शोध मोहीमेत अडथळा

महाड -पोलादपूर पूल दुर्घटनेनंतर पावसाची संततधार सुरुच असल्याने सावित्री नदीपात्रातील शोधमोहीमेत अडथळा येत आहे. त्यातच नदी पात्रात मगरींचा वापर होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. मगरींची दहशत यामुळे एनडीआरएफचे जवान त्रस्त झालेत. 

Aug 6, 2016, 07:48 PM IST

महाड पूल दुर्घटना : शोधकार्यात सिंधुदुर्ग मच्छिमार आणि स्कूबा डायव्हिंगची मदत

महाड पूल दुर्घटनेनंतर विविध शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणा शोध आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. वेगवेगळया संस्था संघटनाही यात मागे नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हयातून मच्छीमार संस्थेचे कार्यकर्तेही स्वयंस्फूर्तीने इथं येवून स्कूबा डायव्हिंग तसेच जाळी लावण्याचे काम करत आहेत.

Aug 6, 2016, 06:24 PM IST

महाड पूल दुर्घटना : शोधकार्यात स्थानिक मच्छिमारांची मोठी मदत

महाड पूल दुर्घटनेत आतापर्यंत जेवढे मृतदेह सापडलेत त्यातील बहुतांश मृतदेह हे तिथल्या स्थानिक मच्छिमरांनी काढले आहेत.

Aug 6, 2016, 06:04 PM IST

महाड पूल दुर्घटना : शोधकार्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत

रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

Aug 6, 2016, 05:03 PM IST

महाड पूल दुर्घटनेतील एसटीचे अवशेष सापडले

पोलादपूर-महाड पूल दुर्घटनेतील एसटीचे अवशेष विसावा हॉटेलजवळ सापडले. 

Aug 6, 2016, 04:43 PM IST

महाड पूल दुर्घटनेत ४२ जण बेपत्ता, १२ मृतदेह सापडलेत

महाड दुर्घटनेत एकूण ४२ जण बेपत्ता आहेत. यापैकी १२ मृतदेह हाती सापडलेत आहेत. दुसऱ्या दिवशी हे मृतदेह सापडलेत. 

Aug 4, 2016, 09:21 PM IST

महाडच्या दुर्घटनेनंतर मुंबईतले ५ जण बेपत्ता

महाडच्या सावित्री नदीच्या दुर्घटनेनंतर नालासोपाऱ्यातले ५ जण बेपत्ता असल्याची माहिती पुढे येत आहे. नालासोपारा पश्चिम येथे राहणारे समीर बलेकर, त्यांच्या दोन बहिणी आणि त्यांचे पती असे ५ जण बेपत्ता आहेत. 

Aug 4, 2016, 08:14 PM IST

महाड दुर्घटनेतील मृतदेह समुद्रात गेले वाहून ?

महाड दुर्घटनेत सावित्री नदीमध्ये वाहून गेलेल्या वाहनांमधील मृतदेहांपैकी तीन मृतदेह सापडले असून, तीनही मृतदेह समुद्र किना-यावर सापडले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हे मृतदेह अरबी समुद्रात वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहेत.

Aug 4, 2016, 12:18 PM IST

महाड : सापडलेले दोन मृतदेह वेगळ्याच दुर्घटनेतले

महाड दुर्घटनेला १९ तास उलटल्यानंतरही बचावकार्याला अद्याप यश आलेलं नाही. सापडलेले दोन मृतदेह वेगळ्याच दुर्घटनेतले असल्याचं आता समोर येतंय. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती चुकीची असल्यानं नातलगांमध्ये संतापाचं वातारवण आहे. 

Aug 3, 2016, 06:20 PM IST