महाड पूल दुर्घटना : शोधकार्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत

रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

Updated: Aug 6, 2016, 05:03 PM IST
महाड पूल दुर्घटना : शोधकार्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत  title=

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

आज सलग चौथ्या दिवशीही या दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांची शोधमोहीम सुरुच आहे. आणि त्यासाठी अत्याधुनिक कॅमे-यांची मदत घेतली जाणार आहे. बोटीवर असे तीन अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात येणार आहे. 

पाण्याखालचं ७०० फूट खोल आणि ४०० फूट रुंद भागाचं चित्रिकरण या कॅमे-यांद्वारे करता येणार आहे. स्वत: सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाड येथील घटना स्थळाला भेट दिली आणि या शोध मोहिमेची पाहाणी केली.

महाड जवळील दुर्घटनेनंतर विविध शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणा शोध आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. वेगवेगळया संस्था संघटनाही यात मागे नाहीत.