lokpal bill

जनलोकपाल मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध – राहुल

लोकपाल बील शेवटच्या टप्प्यात असून बील मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिलीये. लोकपाल विधेयक राज्यसभेच मंजूर होण्याची आशा असल्याची माहिती अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. दिल्लीत पत्रकार परिषदेत काँग्रेसनं आपली भूमिका मांडली.

Dec 14, 2013, 08:37 PM IST

लोकपाल विधेयक राज्यसभेत, विधेयक मंजूर होणार?

लोकपाल विधेयक मंजुरीसाठी सरकार आज राज्यसभेत मांडण्याची शक्यता आहे. लोकपाल विधेयक शुक्रवारी म्हणजे आज चर्चेला आणवं अशी मागणी केलीय. दरम्यान, भाजपने विरोध केलाय तर राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.

Dec 13, 2013, 07:47 AM IST

जनलोकपालसाठी अण्णांचं आजपासून बेमुदत उपोषण

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरलेत. जनलोकपालसाठी अण्णांनी पुन्हा उपोषणास्त्र उगारलंय. राळेगणसिद्धीतून आजपासून अण्णा हे बेमुदत आंदोलन सुरु करणार आहेत.

Dec 10, 2013, 08:41 AM IST

जनलोकपालसाठी अण्णांचं पुन्हा उपोषणास्त्र!

जनलोकपाल बनत नाही तोवर उपोषण करण्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केलीय. उद्यापासून ते जनलोकपालसाठी उपोषण सुरू करत आहेत.

Dec 9, 2013, 03:31 PM IST

गरज पडली तर पुन्हा रामलीला मैदानात - अण्णा

सरकारनं केवळ चर्चाच केली, सुधारणा मात्र नाही, असं म्हणत अण्णांना आता जनआंदोलन हाच एकमेव पर्याय असल्याचं स्पष्ट केलंय.

Feb 1, 2013, 04:30 PM IST

‘आणायचंच असेल तर सशक्त लोकपाल आणा’

लोकपाल बिलातील फेरबदलांना आज कॅबिनेटकडून हिरवा कंदील मिळालाय. मात्र, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मात्र हे लोकपाल टाकाऊ ठरवलंय.

Jan 31, 2013, 04:36 PM IST

अण्णा म्हणाले, 'टीम अण्णा संपली'

टीम अण्णांची कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. कोअर कमिटीचा कार्यकाळ संपल्याची घोषणा अण्णांनी आपल्या ब्लॉगवर केली आहे. आपण राजकीय पक्षाची स्थापना करणार नसल्याचंही अण्णांनी आपल्या ब्लॉगवर स्पष्ट केलं आहे.

Aug 6, 2012, 02:42 PM IST

अण्णा काढणार 'पक्ष', म्हणे द्या माझ्याकडे 'लक्ष'

अण्णा हजारे यांनी राजकीय पक्ष काढण्यात काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. मात्र, स्वतः निवडणूकीला उभे राहण्यास त्यांनी नकार दिला आहे. ते म्हणाले, राजकीय पक्ष सुरु करण्यास काहीही हरकत नाही. देशाला एका धर्मनिरपेक्ष पक्षाची गरज आहे.

Aug 2, 2012, 05:43 PM IST

लोकपाल पुन्हा लटकले, अण्णा उपोषण करणार

लोकपाल विधेयक राज्यसभेत लटकलं आहे. मोठ्या विरोधानंतर सिलेक्ट कमिटीकडे बिल पाठवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झालं आहे. सरकारच्या प्रस्तावाला आवाजी मतदानानं मंजूरी देण्यात आली.

May 21, 2012, 07:18 PM IST

लोकायुक्ताचा मुद्दा वगळला जाणार ?

लोकपाल विधेयकातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकायुक्त. पण कदाचित यापुढे लोकायुक्ताचा मुद्दा वगळून लोकपाल विधेयक समोर येऊ शकतं.

May 10, 2012, 04:27 PM IST

राज्यातील जनतेला जागृत करणार- अण्णा

सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी मैदानात उतरलेल्या अण्णा हजारेंनी नेत्यांच्या भेटीगाठीनंतर आता राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली आहे.

Apr 26, 2012, 08:22 PM IST

लोकपाल : अण्णांचे पुन्हा जंतरमंतर

सक्षम लोकपाल विधेयक सरकारला मंजूर करावे लागेल. ते सकरारचे कर्तव्य आहे, असे टीम अण्णांच्या सदस्य आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी म्हणाल्या. दरम्यान लोकपालबाबत सरकारची उदासिनदा दिसून येत आहे. त्यामुळे मला पुन्हा दिल्लीत जंतर मंतरवर उपोषण करावे लागेल, अशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

Mar 23, 2012, 04:44 PM IST

लोकपाल विधेयक लटकले

राज्यसभा संस्थगित झाल्यानं लोकपाल विधेयक लटकले. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक येण्याची शक्यता आहे. गुरुवारी गोंधळात कामकाज तहकूब झाल्यानं आता राज्यसभेत लोकपालच्या मंजुरीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Dec 31, 2011, 03:40 PM IST

ममता सरकारवर प्रसन्न होणार का ?

राज्यसभेत लोकपाल विधेयकावर महाचर्चा सुरु आहे. पंतप्रधान आणि प्रणव मुखर्जींची ममता बॅनर्जींशी चर्चा सुरु आहे. तृणमुल काँग्रेसला मनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लोकपालसाठी संख्याबळ जुळवण्याची कसरत सुरु आहे. सरकारकडे राज्यसभेत पुरेसं संख्याबळ नाही.

Dec 31, 2011, 09:33 AM IST

सिंघवींचा भाजपावर कडाडून हल्ला

लोकपाल विधेयकावर राज्यसभेत चर्चेच्या दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी भारतीय जनता पार्टी विधेयक मंजुर न करण्यासाठी बहाणे बनवत असल्याचं आरोप केला. देशहित लक्षात घेऊन विधेयक मंजुर करा असं आवाहन सिंघवी यांनी केलं. भाजपा या मुद्दावर स्पष्ट भूमिका घेत नसल्याचा आरोपही केला.

Dec 29, 2011, 05:55 PM IST