loc

पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे जवान राजेंद्र तुपारे शहीद

पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये महाराष्ट्रातले जवान राजेंद्र तुपेकर शहीद झाले आहेत. राजेंद्र तुपे हे कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कारवे गावाचे रहिवासी आहेत.

Nov 6, 2016, 09:18 PM IST

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, पूंछमध्ये गोळीबार

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूंछमधील केजी सेक्टरमध्ये गोळीबार केलाय. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली. अद्यापही गोळीबार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. 

Nov 6, 2016, 10:04 AM IST

सीमारेषेवर एक जवान शहीद, एका दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाला आहे.

Oct 28, 2016, 11:12 PM IST

PoK मध्ये पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये, पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने करत घोषणाबाजीही करण्यात आली. हा पाकिस्तानला मोठा धक्का आहे. 

Oct 27, 2016, 10:11 AM IST

भारतीय लष्कराकडून 7 पाकिस्तानी जवानांना कंठस्नान

सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला दणका दिला आहे.

Oct 21, 2016, 07:32 PM IST

सर्जिकल स्ट्राईक याआधीही झाली होती - केंद्र सरकारची माहिती

मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच भारतानं केलेली सर्जिकल स्ट्राईक सार्वजनिक झाली... त्यानंतर अगोदरच्या काँग्रेस सरकारच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झाल्या होत्या की नव्हत्या यावरून बराच वाद झाला. त्यानंतर आता मात्र या मुद्द्यावर केंद्र सरकारनं अधिकृतरित्या आपली भूमिका स्पष्ट केलीय.

Oct 19, 2016, 10:11 AM IST

'सर्जिकल स्ट्राईक' भारताचा सुरक्षा अधिकार - अमेरिका

भारतानं पाकिस्तान विरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आता अमेरिकेनंही पाठिंबा दर्शवलाय. काश्मीर मुद्यासंबंधी अमेरिकेनं पाकिस्तानला चांगलंच फटकारलंय. 

Oct 13, 2016, 03:31 PM IST

पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशात दिसले दहशतवादी, हल्ल्याच्या तयारीत

गुप्तचर विभागाने एक मोठा खुलासा केला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान सेनेच्या कपड्यांमध्ये काही दहशतवादी दिसल्याचं गुप्तचर विभागाला माहिती मिळाली आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांना गुरु लश्कर कमांडर साजिद जट उर्फ नोमी हा भारतात मोठे हल्ले करण्याचे आदेश देत आहे.

Oct 10, 2016, 07:04 PM IST

पाकिस्तानच्या सेनाप्रमुखांनी केला एलओसीचा दौरा

एलओसीजवळ पाकिस्तान आर्मीचे चीफ राहिल शरीफ यांनी दौरा करुन सुरक्षेच्या आढावा घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राहिल शरीफ यांनी पाकिस्तान सेनेच्या एका यूनिटसोबत एलओसीच्या हाजी पीर सेक्टरचा दौरा केला आहे. एलओसीवर काही हालचाली होऊ शकतात असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय. यानंतर भारतीस सेना देखील अलर्ट झाली आहे.

Oct 9, 2016, 03:48 PM IST

'भारताच्या अवकाशीय सीमेत पोहोचण्याआधीच शत्रूंचा खात्मा करु'

लष्कर, हवाईदल आणि नौसेना कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा सामना करायला तयार आहे. हवाईदलाचे प्रमुख अरुप राह यांनी म्हटलं की, आज परिस्थिती काही वेगळी आहे. हवाईदल देशाच्या शत्रूंच्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांशी निपटण्यासाठी सक्षम आहे. भारताच्या अवकाशीय सीमेत पोहोचण्याआधीच आम्ही शत्रूंचा खात्मा करु असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Oct 5, 2016, 09:05 AM IST

सर्जिकल स्ट्राईकबाबत पीओकेमधील लोकांनी केला मोठा खुलासा

भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर पीओकेमध्ये राहणाऱ्या लोकांनी पाकिस्तानच्या नागरीकांनी मोठा खुलासा केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार २८ आणि २९ सप्टेंबरच्या रात्री पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले.

Oct 5, 2016, 08:44 AM IST