kalbadevi fire

काळबा देवी आग | सुनील नेसरीकर शहीद

काळबा देवी आगीतील अग्निशमन दलाचे जखमी जवान चीफ फायर ऑफिसर सुनील नेसरीकर शहीद झाले आहेत. सुनील नेसरीकर ही आग विझवतांना ४० टक्के जखमी झाले होते. ऐरोलीच्या बर्न हॉस्पिटलमध्ये सुनील नेसरीकर यांच्यावर उपचार सुरू होते.

May 24, 2015, 05:18 PM IST

अग्निशमन दलाची दूरावस्था: ओव्हरटाइमपासून, निकृष्ट दर्जाच्या सांधनांपर्यंत समस्या

काळबादेवी आग दुर्घटनेत मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील तीन अधिकारी शहीद झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या समस्यांचा विषयही ऐरणीवर आलाय. ३४ हजार कोटींचं बजेट असणारी मुंबई महापालिका अत्यंत महत्वाच्या असणाऱ्य़ा या विभागाकडं दुर्लक्ष करत आलीय. अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगपासून ते त्यांच्या ओव्हरटाईमच्या भत्त्यापर्यंत असे अनेक प्रश्न आहेत. ज्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज निर्माण झालीय.   

May 15, 2015, 09:10 PM IST

काळबा देवी आग ; जखमी सुधीर अमीन शहीद

काळबा देवी आगीतील गंभीर जखमी सुधीर अमीन हे शहीद झाले आहेत. ऐरोली नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये सुधीर अमीन यांच्यावर उपचार सुरू होता. 

May 14, 2015, 05:42 PM IST

काळबादेवी आग: अग्निशमन दलाच्या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

काळबादेवी इथं हनुमान गल्लीत अग्नितांडवानं धुमाकूळ घातला होता. या आगीत सहा जण जखमी झालेत. तसंच आग विझवताना अग्निशमन दलाच्या २ जवानांना वीरमरण प्राप्त झालंय. 

May 10, 2015, 08:54 AM IST